आंतरराष्ट्रीय स्पर्धेत श्रीगोंदयाच्या तरुणाने पटकवला प्रथम क्रमांक

0 145
श्रीगोंदा  :-  हिंद मराठी आयोजित आंतरराष्ट्रीय काव्यगंध स्पर्धेमध्ये मूळचा श्रीगोंदयाचा सध्या पुणे येथे असणारा तरुण अक्षय कोथिंबीरे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. साहित्यिक उपक्रम म्हंटला की त्यामध्ये स्पर्धा ही येतेच. त्याचप्रकारे हिंद-मराठी चॅनलतर्फे संपुर्ण जगातल्या नवकवींसाठी ‘काव्यगंध’ स्वरचित काव्यसादरीकरण स्पर्धा शनिवारी २६ जुलै२०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याची अंतिम तारीख २० जुलै असल्यामुळे सर्व स्पर्धकांनी वेळेच्या आत व्हिडिओ देऊन उत्तम प्रतिसाद दिला. तसेच या स्पर्धेमध्ये भारतातूनच नाही तर,परदेशातून फ्रान्स,ऑस्ट्रेलियातूनही स्पर्धकांचा सहभाग असल्याने ही स्पर्धा सर्वांच्या मनावर एक वेगळेच चित्र रेखाटून बसली आहे ‘काव्यगंध’ या स्पर्धेमध्ये एकूण११८ स्पर्धकांचा सहभाग लाभला असून, दिनांक ३० जुलै रोजी सगळे व्हिडिओ प्रेक्षकपसंती साठी सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले.

‘काव्यगंध’ या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण वरिष्ठ साहित्यिक व पत्रकार डॉ. रमेश यादव आणि प्रसिद्ध साहित्यिका डॉ पल्लवी बनसोडे-परुळेकर यांद्वारे केले गेले. या *स्पर्धेचे प्रथम पारितोषिक अक्षय कोथींबीरे (श्रीगोंदा )* व ऋतिक शेजोळे (पालघर) यांनी पटकावले असून, द्वितीय पारितोषिक कल्याणी आडत (कर्नाटक) व गौरी म्हसे (ठाणे) आणि तृतीय पारितोषिक कस्तुरी देशपांडे (ऑस्ट्रेलिया) व मानसी पवार (मुंबई) यांनी पटकावले आहे.

दरम्यान ‘काव्यगंध’ या स्पर्धेचा एक अनोखा पुरस्कार देखील यामध्ये समाविष्ट केला होता तो म्हणजे, प्रेक्षकपसंती पुरस्कार. या पुरस्काराचे विजेते नवी मुंबईतील गौरव वाघोले हे ठरले आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेतून २० उत्तेजनार्थ स्पर्धक निवडण्यात आले. काव्यगंध स्पर्धा ही उत्कृष्टपणे पार पडली सोबतच अशाच नवनवीन स्पर्धा इथून पुढच्या काळात देखील सुद्धा कवींसाठी आयोजित करणार असल्याचे हिंद-मराठीच्या संपूर्ण टीमने जाहीर केले आहे.
Related Posts
1 of 1,487
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: