“मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन” म्हणत तरुणाने केली आत्महत्या

0 381

पुणे –   शहरातील शिवाजीनगर-गोखलेनगर परिसरात राहणारा  निखिल धोत्रे या तरुणाने आपल्या सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक उघडीस आली आहे. ही घटना रविवारी सांध्यकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. निखिलने आपल्या राहत्या घरी पत्नीच्या ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वर्षभरापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. निखिलनं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सासरच्या जाचाचा आणि कर्जबाजारीपणाचा उल्लेख केला आहे.(The young man committed suicide by saying “I will be born in your womb again”)

याघटनेबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी कि पुण्यातल्या शिवाजीनगर-गोखलेनगर परिसरात भागात असलेल्या सुगम चाळीत वास्तव्यास असलेल्या निखिल धोत्रेने रविवारी दि. २२ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानं मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठीदेखील जवळच सापडली. सासरच्यांकडून होणारा त्रास आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीत नमूद करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सुसाईड नोटमधून करण्यात आली आहे.

एकाच कुटुंबातील सात जणांना झाडाला हात पाय बांधून बेदम मारहाण

Related Posts
1 of 1,608

 निखिल धोत्रेनं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आईसाठी भावनिक संदेश आहे. ‘आई तू काळजी करु नकोस. मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई, मी समजून माझ्या बाळाला सांभाळ. त्याची काळजी घे,’ असं निखिलनं चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे.(The young man committed suicide by saying “I will be born in your womb again”)

हे पण पहा – महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो सुसाईड नोट व्हायरल-(Tehsildar Jyoti Deore)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: