आधी मुलांची गळा दाबून हत्या नंतर गळफास घेत महिलेनं संपवला आपला जीव

0

लखनऊ –  एका २५ वर्षीय आईने आपल्या दोन मुलांची हत्या करून स्वतः गळफास घेऊन  आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद शहरात घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. (The woman ended her life by strangling the children first and then strangling them)

या प्रकरणाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की लोनी बॉर्डर परिसरातील उत्तरांचल कॉलनीत राहाणाऱ्या 25 वर्षीय प्रिया दहियानं 18 जुलै रोजी सायंकाळी आपल्या पाच वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. यानंतर तिनं आपल्या 1 वर्ष 6 महिन्याच्या मुलाचीही गळा दाबून हत्या केली. आपल्या दोन्ही मुलांचा जीव घेतल्यानंतर प्रियानं स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तिघांनाही दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी या तिघांनाही मृत घोषित केलं.

Porn apps प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

 घरात पती-पत्नी आणि मुलांशिवाय दुसरं कोणीच राहात नव्हतं. अशात प्रियानं आपल्या दोन मुलांचा जीव घेत स्वतःही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या घटनेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.  (The woman ended her life by strangling the children first and then strangling them)

Related Posts
1 of 1,153

काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचे आहे व त्यांची दिशा कोणती याबाबत संभ्रम- शिवसेना

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: