प्रतिनिधी- DNA मराठी टीम
अहमदनगर – बाभूळगाव राहुरी येथील मनीषा गोरख पाटोळे या विधवा महिलेला सासरच्या नातेवाइकांकडून मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) गटाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अलका बोर्डे समवेत मनीषा पाटोळे, आशाबाई मिसाळ, कचरू मिसाळ, हर्ष पाटोळे, सार्थक पाटोळे, सुशांत महस्के, पवन भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मनीषा पाटोळे या विधवा महिलेला अनेक दिवसापासून सासरच्या नातेवाईक दत्तू चिखले, सुभाष खिलारे, बापू खिल्लारे, ज्ञानेश्वर खिल्लारे, संदीप खिलारे, संतोष खिल्लारे, महेश खिल्लारे, सागर चिखले, पूनम चिखले, दगडाबाई मिसाळ, झुबराबाई खिलारे, बबई खिलारे, रंजना चिखले हे मानसिक व शारीरिक त्रास देण्याचे काम सातत्याने करत आहे. तिचे पती मयत झाले असून त्यांच्या नावे असलेली मालमत्ता ही त्यांच्या पत्नी मनीषा पाटोळे तिच्या नावावर झाली.
त्यानंतर सासरच्या नातेवाईकांनी मोठा त्रास देण्यास सुरुवात केली. मनीषा पाटोळे यांच्या नावावर त्यांच्या पतीची जागा आल्याने सासरच्या नातेवाईकांचा रोस खूप वाढला आहे. मनीषा यांच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये लावलेला ऊस दमदाटी करून सासरच्या लोकांनी काढून घेऊन गेले व दमदाटी केली. मनीषा हिला दोन लहान मुलं असून देखील तिला मोठ्या प्रमाणात त्रास देण्याचे काम करत आहे. या प्रकरणात मनीषा हिने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगितले असता त्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊन बाहेर काढून दिले 13 मार्च रोजी मनीषा हिला मारहाण केली परंतु त्यावर 504.506 प्रमाणे साधी एन सी दाखल केली त्यावर पोलिसांनी त्यांना पाठीशी घातल्याने 30 मार्च रोजी मनीषा हिला परत मारहाण केली.
यावर मनीषाचे वडील कचरू मिसाळ यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली परंतु त्यांचे काहीच ऐकून घेतले नाही. त्यामुळे मनीषा पाटोळे च्या नावावर असलेल्या जमिनीमुळे यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे आरोपींवर लवकरात लवकर योग्य ती कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.