विश्वचषकातून बाहेर पडताच वेस्ट इंडिजच्या ‘या’ खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

0 577
 नवी मुंबई –   टी- २० वर्ल्डकप (T- 20 World Cup) मध्ये काल दि. ०४ नोव्हेंबर गुरुवार रोजी श्रीलंका (Sri Lanka) ने सर्वांनाच धक्का देत गतविजेता  वेस्ट इंडिज (West Indies) च्या संघाला पराभूत केला आहे. या पराभवानंतर वेस्ट इंडिजच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) ने आपल्या निवृत्तीची (Retirement) घोषणा केली. सुपर १२ (Super 12) मधील ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध होणार सामना हा त्याचा अंतिम सामना होणार आहे. गुरुवारी झालेल्या पराभवानंतर वेस्ट इंडिज संघ टी- २० वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे.  (The West Indies ‘This’ player announced his retirement shortly after his exit from the World Cup)
आपल्या निवृत्तीची घोषणा करताना ड्वेन ब्राव्हो म्हणाला  मला वाटतं निवृत्तीची वेळ आली आहे. माझी कारकीर्द उत्तम राहिली आहे. १८ वर्षे वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करताना मी अनेक चढउतार पाहिले आहेत. माझ्या संघाचे प्रतिनिधीत्व केल्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि कॅरेबियन लोकांनी माझ्यावर इतके दिवस जे प्रेम केले ते अप्रतिम आहे, असे ब्राव्हो म्हणाला.

व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे भविष्य आहे असे मला वाटते. आम्हाला फक्त युवा खेळाडूंना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्याची गरज आहे. क्रिकेटमध्ये छाप पाडणे कठीण आहे. मी माझ्या ७०, ८० आणि ९० च्या दशकातील महान खेळाडूंचा आभारी आहे, ज्यांनी मला खेळताना पाहून मला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा दिली, असे ही ब्राव्हो म्हणाला.

Related Posts
1 of 65

पत्नीच्या प्रियकरानेच काढला पतीचा काटा…., दोघांना अटक

ब्राव्हो २०१२ आणि २०१६ मध्ये टी २० विश्वचषक जिंकणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियन टीमचा भाग आहे. त्याने वेस्ट इंडिजसाठी आतापर्यंत एकूण ९० टी-२० सामने खेळले असून १ हजार २४५ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने ७८ विकेट्सही घेतल्या आहेत.(The West Indies ‘This’ player announced his retirement shortly after his exit from the World Cup)

हे पण पहा –  बेकायदेशिर बायो डिझेलची विक्री करणाऱ्या अकरा आरोपींना अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: