
पारनेर – सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पडणारे पावसाचे पाणी पूर्वेला वळविणे शक्य आहे. त्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून साकळाई, शहांजापूर, गटेवाडी, कान्हूर पठार व कोरठण उपसा जलसिंचन योजना मार्गी लागू शकतात. यातून पारनेर व नगर तालुक्यातील पठारी भागातील शेतीस पाणी मिळू शकते असा दावा द भोर फाऊन्डेशनचे संचालक जगन्नाथ भोर केला आहे.
भोयरे पठार व भोयरे खुर्द आणि या ठिकाणी ग्रामस्थांनी सरपंचा बाबा नाथा टकले यांच्या अध्यक्षते खाली घेतलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
या वेळी भोयरे पठारचे सरपंच बाबा टकले, उपसरपंच राजेश बोरकर, अरुण पंडीत, भोयरे खुर्दचे सरपंच राजेंद आमले दोन्ही ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पडणारे पावसाचे पाणी पूर्वेला वळविणे शक्य आहे. त्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून साकळाई, शहांजापूर, गटेवाडी, कान्हूर पठार व कोरठण उपसा जलसिंचन योजना मार्गी लागू शकतात. यातून पारनेर व नगर तालुक्यातील पठारी भागातील शेतीस पाणी मिळू शकतेयासाठी सातत्यपूर्वक पाठपुरावा चालू आहे. प्रथम साकळाई उपसा जलसिंचन मार्गी लागणार व त्यानतर इतर योजना मार्गी लागतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भोर यांच्या चळवळीला पाठिंबा
जगन्नाथ भोर यांनी सुरु केलेल्या चळवळीला ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे. यासाठी दोन्ही गावात कृती समिती स्थापन केली जाणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.