पेट्रोलच्या वाढत्या दराबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले….

0 10

नवी दिल्ली –  देशात मागच्या बारा दिवसांनी सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कमी कधी  होईल ? असा प्रश्न आज देशातील प्रत्येक नागरिक सरकारला विचारत आहे. देशातील अनेक भागात आज पेट्रोल १०० रुपये प्रति लिटर मिळत असल्याने सामान्य नागरिकांचे खिसे चांगलेच खाली होत आहे.

देशात मागच्या बारा दिवसांनी सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बद्दल  आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी केले आहे. यामुळे तेल आयात करणाऱ्या देशांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के तेल आयात करतो. भारत कच्च्या तेलाच्या आयातीत जगातील तिसरा मोठा देश आहे .

Related Posts
1 of 1,292

आम्ही त्यांना आवाहन करीत आहोत की, किमती वाढवू नये. येत्या काळात यात बदल होणार आहे. प्रधान म्हणाले, कोरोनामुळे सरकारचे बजेट लक्षणीय वाढले आहे. आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी सरकारने गुंतवणुकीत वाढ केली असून, याशिवाय भांडवली निधीतही ३४ टक्के वाढ केलीय.

सरकारला खर्च करण्यासाठी पैशांची गरज आहे आणि म्हणूनच ते कर वसूल करतात. केंद्र आणि राज्य दोन्ही पेट्रोल डिझेलवर कर आकारतात. राज्य सरकारही यावेळी खर्च वाढवित आहे, त्यामुळे त्यालाही अधिक कराची गरज आहे. अर्थमंत्री या समस्येवर तोडगा काढतील, अशी आशा पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: