DNA मराठी

सत्तेच्या नशेत नेत्यांकडून गैर कृत्यांचे प्रकार वाढ, राजकारणात डागाळलेली नेते, तरीही मी तो नव्हेच.

राजकीय नेते मंडळींची प्रतिमा का खालावत चालली याचा विचार आता प्रत्येक पक्षाने केला पाहिजे.

0 136

अहमदनगर:- सत्तेच्या नशेत नेत्यांकडून गैर कृत्यांचे प्रकार वाढत, राजकारणात गेल्या काही दिवसांपासून डागाळलेली नेते मंडळी वाढू लागलेली आहे. त्यामुळे राजकारणाकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा कल वाढत चालला आहे. राजकीय नेते मंडळींची प्रतिमा का खालावत चालली याचा विचार आता प्रत्येक पक्षाने केला पाहिजे.

 

राज्याच्या राजकारणात अनेक राज्यकरणी नेते आणि मंत्र्यांवर ज्या प्रकारे आरोप होत आहेत, त्यांनी आरोपातून निर्दोष निघेपर्यंत राजकारणातून बाजूला होणे गरजेचे आहे.अन्यथा राजकीय नेत्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलेला दिसून येईल.राजकारणात आता घराणेशाही सुरु झालेली आहे. या घराणेशाहीमुळे आता नवीन माणसे राजकीय पटालवर येणे कमी झालेले आहे. जी आलेली आहेत. ती राजकीय कुरघोड्यांमुळे बाजुला फेकले जात आहे. पूर्वीच्या नेत्यांप्रमाणे आता राजकारणातील नेते मंडळी राहिलेली नसून एकमेकांवर कुरघोड्या करणारे नेते तयार झालेले आहेत.

२५ वर्षांपूर्वीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बिल्डरची हत्या. २५ लाखांची सुपारी  देऊन बिहारमधून बोलावले शुटर. 

या कुरघोड्यांमध्ये पातळी सोडून नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. यामुळे राजकीय प्रतिमाच आता धुळीला मिळालेली आहे. राजकीयवलयामुळे अनेकजण नेत्यांकडे आकर्षित होत असतात. यामध्ये अबला वृध्दांचा समावेश असतो. काही नेत्यांनी आपल्या कारणाम्यांनी राजकारणाला बदनाम केलेले आहे. चित्रपटात दाखविले जात असल्याचे दृश्यांसारखे प्रकार काही राजकीय नेत्यांकडून होत आहे. त्यामुळे नेत्यांच्या खादीला काळा डाग लागलेला आहे. हा डाग पुसण्याचा प्रयत्न मात्र नेत्यांसह पक्षांकडून होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही.

Related Posts
1 of 632

Sale of adulterated milk :- नेवाशात भेसळयुक्त दुधाची विक्री?

त्यामुळे ठराविक नेत्यांकडून  होणाऱ्या गैरकृत्यांचे प्रकार वाढत चालले आहे. यामुळे सर्वसामान्य जनताही अशा नेत्यांकडे कामे घेऊन जाताना टाळाटाळ करीत आहेत.मागील दोन ते तीन वर्षात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांवर महिलांनी अनेक आरोप केलेले आहेत. काहींवर गुन्हे दाखल झालेले आहेत. यावर संबंधित नेत्यांवर त्यांच्या विरोधकांनी आगपाखड करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे.

परंतु राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर काहीजण सत्ताधारी गटात गेल्यामुळे आता त्यांच्यावर आरोप करणारे शांत झालेले आहेत. तर काही विरोधी गटात राहिल्याने त्यांच्यावर आता आरोप होत आहे. काहीवर गुन्हे दाखल होण्याच्या प्रक्रिया सुरु आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: