चर्चेचा विषय ठरलेले डॉ. दत्‍तराम राठोड यांनी मिळवली सायबर लॉ पदवी

0 381

अहमदनगर –   वाहनाच्या वापरण्यास बंदी असलेल्या एलबीटी प्रकारच्या घातक डिझेलमध्ये रंग बदलून डिझेलची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड करुन शहरात चर्चेचा विषय ठरलेले तत्कालीन नगरचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि सध्याचे अमरावती पोलीस अधीक्षक डॉ. दत्‍तराम राठोड (Dr. Dattaram Rathod) यांना नुकताच डिप्लोमा इन सायबर लॉ ( Cyber Law) ही पदवी (Degree) मिळाली आहे. याच बरोबर आता दत्‍तराम राठोड यांच्याजवळ एकूण 13 पदव्या झाले आहे. (The topic of discussion was Dr. Dattaram Rathod holds a Cyber Law degree)

माणिकचंद पहाडे (MP) लॉ कॉलेज (Law College) औरंगाबाद (Aurangabad) मधून त्यांनी 85 टक्के मिळवून ही पदवी प्राप्त केली आहे. नुकताच जाहीर झालेल्या निकालांमध्ये दत्ताराम राठोड यांनी 400 पैकी 340 गुण मिळवले आहे. या यशानंतर डॉ. दत्ताराम राठोड यांच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Related Posts
1 of 1,603
राठोड यांची ऑक्टोबर 2020 मध्ये नांदेड येथून अहमदनगर शहरात बदली झाली होती. पदभार स्वीकारल्यानंतर महिन्याभरात राठोड यांनी शहरात चालणारे अवैध धंद्यांवर  अनेक ठिकाणी छापे टाकत कारवाई केल्या होत्या. मात्र त्यानंतर एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राठोड यांची नगर शहरातून बदली करण्यात आली होती. (The topic of discussion was Dr. Dattaram Rathod holds a Cyber Law degree)

हे पण पहा  – Hasan Mushrif | हसन मुश्रीफ पत्रकार परिषद

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: