DNA मराठी

देशात पुन्हा कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका; केन्द्र सरकार करणार निर्बंधांची घोषणा?

0 312
The threat of a fourth wave of corona again in the country; Central government to announce sanctions?
 
दिल्ली –   मागच्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा देशाची राजधानी दिल्ली (Delhi) येथे कोरोना बाधित रुग्णांची(corona patients) संख्या वाढत आहे. दिल्लीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एका आठवड्यातच दुप्पट झाली असल्याने केंद्र सरकार पुन्हा एकदा काही निर्बंध लागू करण्याची शक्यता आहे. गुरुवारी दिल्लीत 325 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
त्यामुळे आता राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) पुढील आठवड्यात 20 एप्रिल रोजी एक महत्त्वाची बैठक घेणार आहे. या बैठकीत दिल्लीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि मास्क न लावल्यास होणारा दंड यावर चर्चा होणार आहे. कोरोनाच्या मागील लाटेप्रमाणेच पुन्हा एकदा शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.

दिल्ली सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 20 एप्रिल रोजी होणाऱ्या दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. लेफ्टनंट गव्हर्नरच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत कोविडच्या सद्य परिस्थितीवर चर्चा केली जाईल. बैठकीत गरजेनुसार योग्य ती पावले उचलण्याचा निर्णय घेतला जाईल. या बैठकीत मास्क अनिवार्य करण्याचा निर्णयही घेण्यात येऊ शकते.  विशेषत: गर्दीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य करण्याचा निर्णयही DDMA च्या बैठकीत घेतला जाऊ शकतो.

हे निर्णय घेण्यात येण्याची शक्यता

Related Posts
1 of 2,525

बाजारात मास्क अनिवार्य असू शकतो

सिनेमा हॉलमध्येही सामान, कडक निर्बंध वाढू शकतो

मेट्रोमध्येही प्रवास करताना मास्क अनिवार्य केले जाऊ शकतात

मास्क देखील कार्यालयात लागू करण्यास सांगितले जाऊ शकतात.

दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. त्याचवेळी, संसर्ग दर 2.49 टक्क्यांवरून 2.39 टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी, कोरोनाचे 325 नवीन रुग्ण आढळले. तर यापूर्वी बुधवारी 299 संक्रमित आढळले होते. बुधवारी 12,022 नमुने तपासण्यात आले, तर गेल्या 24 तासांत 13,576 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: