राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, अहिल्यादेवी होळकर व माता रमाई यांचे विचार हे आधुनिक महिलांसाठी प्रेरणादायी- सौ.शुभांगी ताई जंगले 

0 10

 श्रीगोंदा  :- श्रीगोंदा तालुक्यातील विविध भागांमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत, महिलांचा गुणगौरव करीत, शुभेच्छा देण्यात आल्या. समाजासाठी अपवादात्मक कार्य करणाऱ्या महिला, उच्चपदस्थ, अधिकारी, पदाधिकारी, राजकारणी, शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा देशभर सर्व स्तरांतून सन्मान करण्यात आला. याप्रमाणेच श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी, जोशी वस्ती येथेही भालचंद्र सावंत (सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार) यांच्या वैचारिक संकल्पनेतून नमूद ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी सौ. शुभांगी ताई उदयसिंग जंगले यांनी कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. त्यांनी यावेळी सर्वांना सांगितले की, कोणत्याही महिलेने घाबरून न जाता, आधुनिक ताकतीने व कायद्याच्या आधाराने आपली पुढील वाटचाल करावी. जेणेकरून आपल्याला अडचणींत धीराने सामोरे जाता येईल. यासाठी आपण इतिहासातील महामातांचा संदर्भ डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. त्यांचा गौरवशाली इतिहास आणि प्रेरणादायी घटना भविष्यातील वाटचालीसाठी योग्य दिशा देणाऱ्यां आहेत. त्यामुळे जिजाऊ माँ साहेब, सावित्रीमाई, रमाई व अहिल्यादेवी यांचा समाज आणि मानवतेसाठीचा आदर्श आपण डोळ्यापुढे ठेवणे काळाची गरज आहे. असे गौरवोद्गार सौ. शुभांगी जंगले यांनी उपस्थितांसमोर मांडले. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त “मानव विकास संशोधन केंद्र” आयोजित या कार्यक्रमात महिला सबलीकरण व महिलांचे संविधानिक अधिकार या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.शुभांगी ताई जंगले या बोलत होत्या.
राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, अहिल्यादेवी होळकर व माता रमाई यांचे विचार व इतिहास महिलांनी जीवनात क्रांती घडवीण्यासाठी आत्मसात करावा. असेही त्यांनी सांगितले. आशा वर्कर सौ. भामाताई रावसाहेब फुलमाळी यांनी समाजामध्ये काम करतांना, महिलांना विविध ठिकाणी येणाऱ्या अडचणींचा सामना करीत, आपले आरोग्य, महिला बचत गट, महिला संघटन या विषयावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
Related Posts
1 of 1,292
त्याच बरोबर ग्रामपंचायत लिंपणगाव सदस्य सौ. उषाताई फुलचंद सावंत यांनीही स्वागत पर भाषणात बोलतांना महिलांचे अधिकार व हक्क या विषयावर विचार व्यक्त केले. तसेच, मानव विकास संशोधन केंद्र अध्यक्ष भालचंद्र दत्तात्रय सावंत यांनी महिलांच्या विविध समस्या, महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार व महिलांचे संविधानिक अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांमध्ये शशिकला आप्पा तांबे, रुक्मिणी नारायण तांबे, लक्ष्मी काशिनाथ शिंदे, शोभा काशिनाथ शिंदे, बयाबाई रघुनाथ शिंदे, वंदना भिवाजी विरकर, पंचफुला राजेश शिंदे, रघुनाथ गणपत शिंदे, नारायण तांबे, अमोल चरणदास काळे, राजेश दादाराव शिंदे, भिवाजी विरकर, राहुल भंडारी व समाज बांधव उपस्थित होते.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: