सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दारात वाढ , जाणून घ्या नवीन दर

0 231

नवी मुंबई –  मागच्या काही दिवसांपासून एक जागी स्थिर असणाऱ्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या किंमतीत मागील तीन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती संपूर्ण देशात वाढ झाली आहे .  याच बरोबर देशातील अनेक शहरात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलच्या किंमती प्रतिलीटर १०२ रुपये १४ पैसे इतकी झाली आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत हाच आकडा १०८ रुपये १९ पैसे प्रतिलीटर इतका वाढला आहे. त्याचवेळी या दोन्ही राजधान्यांमध्ये डिझेल्या किंमती अनुक्रमे ९० रुपये ४७ पैसे आणि ९८ रुपये १६ पैसे इतकी झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. राज्यांकडून लावल्या जाणाऱ्या करांमध्ये तफावत असल्यामुळे हे दर वेगवेगळे ठरतात. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमती. शनिवारच्या आकडेवारीनुसार या किंमती ७८.६४ डॉलर प्रतीबॅरल इतक्या आहेत.

Related Posts
1 of 1,487

२४ तारखेपासून पुन्हा दर वाढू लागले

सप्टेंबर महिन्यात ५ तारखेपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, आंतरराष्ट्रीत बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढू लागल्यामुळे अखेर रोज बदलणाऱ्या इंधन दरांची व्यवस्था भारतीय कंपन्यांनी पुन्हा एकदा सुरू केली. त्यानुसार २४ सप्टेंबरपासून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) या भारतीय तेल कंपन्यांनी रोज इंधनाचे सुधारीत दर देण्यास सुरुवात केली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: