तृतीयपंथी समाजाला बदनाम करून चोरी करणारा भामटा जेरबंद…..

0 195
पुणे  –   गेले कित्येक दिवसांपासून कलाकारांना हाताला काम नाही सांस्कृतिक कार्यक्रम जागरण गोंधळला सुद्धा बंदी आहे .त्यामुळे कलाकारांचे जीवन हलाखीचे झाले आहे. सध्या शासन लॉकडाउनच्या अटी शिथिल करत आहे काही दिवसानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे. त्यासाठी कलाकार आता तयारीला लागले आहेत. जेजुरी शहरांमध्ये वाघ्या मुरळी चे काम करणारे अनेक लोक आपली कलासादर करून उपजीविका करतात. परंतु अनेक दिवस त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशातच आता या कार्यक्रमाला परवानगी मिळणार म्हणून त्यांच्यामध्ये आशेचा किरण निर्माण झालेला आहे त्यांनी जागरण गोंधळ पार्टी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे . (The thief who defames the third party society and steals is arrested …..)
जेजुरी मध्ये अशीच एक मुरळी चे काम करणारी कलाकारीने आपली पार्टी तयार करण्याचे काम सुरू केले त्यासाठी तिला सहकलाकार ची आवश्यकता होती तिची फेसबुक वरून एका तृतीयपंथी अशी ओळख झालेली होती सदरचा तृतीयपंथी व्यक्ती तिच्या घरी एक वर्षातून दोन-तीन वेळा राहून गेलेला आहे जागरण गोंधळ पार्टी मध्ये सहकलाकार म्हणून काम करण्यासाठी तो तयार आहे असे सदर महिलेस सांगितले .त्याप्रमाणे आता जागरण गोंधळ पार्टी सुरू होणार म्हणून सदर महिलेने सदर तृतीयपंथीयांना बोलून घेतले घरी तो दोन दिवस मुक्कामी राहिला. दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी जागरण-गोंधळाच्या पार्टी ला जायचे होते सदर तृतीयपंथी साडी मेकअप असं करून सदर महिलेच्या घरांमध्ये वावरत होता तिला कसल्याही प्रकारची शंका नव्हती.
Related Posts
1 of 1,486
सदर महिलेच्या हाताला काम नसल्याने आधीच ती व्यथित झालेली असताना एक दिवस सदर तृतीयपंथी घरामध्ये असलेले दीड तोळा सोन्याचे मंगळसूत्र व माळ घेऊन व घरातील सहा हजार रुपये घेऊन भल्या पहाटे पोबारा केला एकूण पन्नास ते साठ हजार रुपयांचा ऐवज चोरून घेऊन गेला पहाटे चार च्या वेळेस तो घरातून गेला त्यावेळेस सदर महिलेने कुठे चालला असे त्याला विचारले असता  तो लघुशंकेला जाऊन परत येत आहे  असे सांगितले परंतु तो परत आला नाही सदर व्यक्तीने त्याचा  पत्ता तो सातारा येथे राहत असल्याचे सांगितले होते परंतु कुठेही मूळ पत्ता दिला नव्हता मग सदर महिलेने पोलिस ठाण्यात दुसऱ्या दिवशी रीतसर घरांमधून तृतीय पुरुषाने चोरी केल्याची फिर्याद दाखल केली आणि मग जेजुरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि मग पोलिसांच्या तपासात सदर व्यक्ती ही सोलापूर शहरात राहत असल्याची माहिती मिळाली आणि मग तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या रीतसर परवानगी घेऊन व मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सदर मुरळी सोबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत झेंडे पोलीस हवालदार दशरथ बनसोडे पोलीस शिपाई प्रवीण शेंडे व पोलीस नाईक धर्मराज  खांडे यांची टीम सोलापूर साठी तपासाला रवाना केली आणि सोलापूर शहरात सदर आरोपीचा शोध घेतल्यानंतर पोलिसांना कळले की सदर व्यक्ती तृतीय पुरुषी नसून तो एक संपूर्ण पुरुष आहे त्याचं नाव अभिषेक रावसाहेब भोरे वय सत्तावीस वर्ष राहणार उत्कर्ष नगर विजापूर नाका सोलापूर असे आहे .
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदर महिलेचे चोरलेले दीड तोळा वजनाचे दागिने मोबाईल व पैसे काढून दिले त्याची किंमत जवळजवळ साठ हजार रुपये आहे पोलिसांनी सदर व्यक्तीला अटक केली तृतीयपंथी व्यक्ती एक वेळ रस्त्यावर भीक मागतील परंतु चोरी सारख्या घटना ते सहसा करत नाहीत हा पोलिसांचा आजवरचा अनुभव आहे म्हणून सदर व्यक्ती तृतीयपुरुषी असू शकत नाही असा पोलिसांचा प्रथम पासून काय होता सदर व्यक्ती तृतीयपंथीयांची कलाकारी करून महिलांमध्ये सहज वावरत असल्याने पोलीस त्याने असे आणखी काही चोर्‍या किंवा गैरप्रकार केलेले आहेत का याबाबत तपास करत आहेत यामुळे सर्व जनतेला अपील करतो की जेजुरीमध्ये अनेक अनोळखी लोक देवदर्शना च्या नावाखाली येत असतात अशा लोकांना लॉजेस घरामध्ये प्रवेश देण्यापूर्वी त्याची प्राथमिक माहिती घेत जावे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाहीसासवड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माननीय यादव मॅडम यांनी त्याला चार दिवस पोलिस कस्टडी रिमांड दिलेली आहे अशी माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.(The thief who defames the third party society and steals is arrested …..)
 हे पण पहा  – Eid E Milad un Nabi Ahmednagar 2021
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: