चोरट्याने घरातून लंपास केले २० लाखांचा ऐवज अन् .. टीव्ही स्क्रीनवर लिहिले I LOVE YOU

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरमालक असीब हे दोन दिवसांच्या सुट्टीवर कुठेतरी बाहेर गेले होते. मंगळवारी ते परत आले असता त्यांच्या घराची तोडफोड झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी सामानाची तपासणी केली असता सुमारे 20 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने व दीड लाखांची रोकड घरात नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
घरमालकाने तक्रारीत म्हटले आहे की, चोरट्यांनी त्यांच्या घरातील टीव्ही स्क्रीनवर मार्कर लावून ‘आय लव्ह यू’ असे लिहिले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.