पैसे दुप्पट करण्याचा मोह अंगाशी व्यवसायिकाला साडेचार लाखाला गंडा

0 216
श्रीगोंदा :-  पैसे दुप्पट करुन देतो, अशी अशी बतावणी करुन  दत्तात्रेय महादेश शेटे (करमाळा, जि. सोलापुर) या कुशन व्यावसायिकाला तब्बल साडेचार लाखाला गंडा घालण्याची घटना घडली. हिरडगाव फाटा (ता. श्रीगोंदे) येथे ही लूट भोंदुगिरीचा प्रकार करुन करण्यात आली. याप्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फिर्यादी व आरोपींच्या मोबाईल संभाषणावरुन आरोपींचा शोध घेतला जात आहे.(The temptation to double the money has cost the businessman Rs 4.5 lakh)
स्वस्तात सोने देण्याची बतावणी करुन कोट्यावधी रुपयांना गंडा घालण्याच्या गुन्हेगारीचे जनक असणाऱ्या श्रीगोंदे तालुक्यात आता पैसे दुप्पट करुन देण्याची भोंदुगिरी समोर आली आहे. शिवाजीनगर करमाळा येथील कुशन व्यावसायिक असणारे दत्तात्रेय शेटे यांना अशाच मोहात अडकवून हिरडगाव फाटा येथील साईकृपा कारखान्याजवळ साडेचार लाखाचा लूटण्यात आले.
शेटे यांच्यावर करमाळा येथील एका बँकेचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी त्यांना पैशाची गरज होती. ओळखीतून एका जणाने श्रीगोंद्यात पैसे दुप्पट करुन देणारे लोक असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानूसार आरोपींसोबत त्यांची ओळख व बैठका घडवून आणण्यात आल्या. पैसे दुप्पट करण्याच्या मोहात अडकवून १४ ऑगस्ट रोजी सांयकाळी सातच्या सुमारास दोन अज्ञान आरोपींनी त्यांना इच्छितस्थळी बोलाविले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शेटे यांना असलेले बॅंकेचे कर्ज फेडण्यासाठी रोख रक्कम  दुप्पट करुन देतो असा विश्वास संपादन करुन फिर्यादीकडुन साडेचार लाख रुपये रोख रक्कम घेण्यात आली.  फिर्यादीचे हातात तांदूळ, लिबू, फुले ठेवुन सदरची रक्कम ही भगव्या कपड्यामध्ये पॅक करुन कारच्या डिक्कीमध्ये ठेवली. शेटे यांना  मोटारीला  प्रदक्षिणा घालण्यास सांगून डिक्कीमधील रोख रक्कम काढुन घेवुन फिर्यीदीची विश्वास घात करुन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Related Posts
1 of 1,481
तपासी अमंलदार उपनिरीक्षक दिलीप तेजनकर यांना या गुन्ह्यात जादुटोणा विरोधी कायद्याचा आधार घेण्यात आला आहे का. असे विचारले असता ते म्हणाले, तपासात काय निष्पन्न होते त्यानंतर हे कलम लावण्याबद्दल विचार होईल. लूटीतील आरोपींचा शोध घेत असून फिर्यादी सोबत आरोपींच्या झालेल्या मोबाईल संभाषणाचा आधार घेत आरोपींचा शोध घेतोय.(The temptation to double the money has cost the businessman Rs 4.5 lakh)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: