सलाम! मंदिराच्या पुजाऱ्यानेच स्वतःच्या हिमतीवर बांधले मंदिर …

0 130
 प्रतिनिधी दादा सोनवने
श्रीगोंदा-  :-   श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या गावात एक प्राचीन महादेव मंदिर आहे कालांतराने मंदिराच्या भिंती कोसळायला लागल्या त्यावेळी तेथील पुजाऱ्याने स्वतःच्या खर्चाने मंदिर बांधकामाला सुरवात करून समाज्यापुढे एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. ( The temple was built by the priest of the temple on his own initiative … )
महादेव मंदिराचे पुजारी बबन पांडुरंग वाळुंज वय 90 वर्षे हे पाटबंधारे विभागाय पाटकरी म्हणून काही वर्षांपूर्वी कार्यरत होते तेव्हापासून त्यांना महादेव भक्तीचा लळा लागला ते अनेक वर्षांपासून महादेव भक्ती करत आहेत त्यानंतर ते सेवेतून कार्यमुक्त झाल्यानंतर त्यांनी आपले सर्वस्व महादेव चरणी अर्पण करण्याचे त्यांनी ठरविले दरम्यानच्या काळात मंदिराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली ती त्यांनी पहिली आणि नोकरीतून कार्यमुक्त झाल्यावर मिळालेल्या रकमेतून त्यांनी महादेव मंदिर बांधकाम सुरू केले त्यांनी आतापर्यंत मंदिराला तब्बल सहा लाख रुपये खर्च केले आहे.
Related Posts
1 of 1,603
 त्यातून मंदिराचे काम सल्याप लेव्हल पर्यंत आले आहे त्यांचा अजूनही दोन लाख रुपये खर्च करण्याचा मानस आहे असेही त्यांनी सांगितले आता सध्या त्यांना मिळणाऱ्या पेन्शन मधून मंदिराचे बांधकाम सुरू आहे माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की जन्माला आलो मोकळया हाताने आणि जाताना पण जाणार मोकळ्या हाताने त्यामुळे आहे ते सर्व काही देवाचेच आहे असेही त्यांनी सांगितले परंतू या मंदिरासाठी इतकी मोलाची मदत करणारा एकमेव व्यक्ती ठरले आहेत असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही अश्या दानशूर व्यक्तीला सलाम! ते पुढे बोलताना म्हणाले की माझ्या वतीने जेवढे होईल मी तेवढे करणारच आहे तरी काही दानशूर व्यक्तीने सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मंदिराचे पुजारी बबन पांडुरंग वाळुंज यांनी केले आहे. ( The temple was built by the priest of the temple on his own initiative … )

सादिक बिराजदार मृत्यू प्रकरण सीआयडीकडे ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: