
अहमदनगर : राहत्या घरासमोर उभी असलेल्या शिक्षिकेकडे बघून अश्लील हावभाव करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केल्याची घटना डॉन बॉस्को जवळ सावेडी परीसरात घडली.
या बाबतची माहिती अशी सावेडी परीसरातील बॉस्को, कॉटेज कॉर्नर येथील राहते घरासमोर ऊभी असलेल्या एका शिक्षिकेच्या घराजवळ राहणारा उन्मेश क्षिरसागर हा तेथे आला व तो शिक्षीकेकडे त्याने त्याच्या तोंडाने व हाताने तिच्याकडे पाहुन अश्लिल हावभाव केले.
आधुनिक युगात संगणक ज्ञान हे महत्त्वाचे : आमदार संग्राम जगताप
तेव्हा त्या शिक्षिकेने त्याला तु माझ्याकडे का पाहतोस व असे हावभाव का करतोस अशी विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करुन तुझ्याकडे बघुन घेतो तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
या प्रकरणी तोफखाना पोलीसांनी उन्मेश क्षिरसागर (पूर्ण नाव माहित नाही) रा.डॉन बॉस्को, कॉटेज कॉर्नर, सावेडी, अ.नगर ) यांच्याविरुध्द विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद केली.