शिक्षक खेळतायेत विद्यार्थी यांच्या जीवाशी पालकांना ठेवलेय अंधारात

श्रीगोंदा :- शनिवार दि.९ पासून ४ दिवस श्रीगोंदा शहरातील महादजी शिंदे विद्यालयात चित्रकलेच्या एलिमेंटरी तसेच इंटरमिजीएट परीक्षा सुरू असून या परीक्षेसाठी तालुक्यातून सुमारे ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे.
या परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी तालुक्याच्या विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी टमटम, रिक्षा, टेम्पो, तसेच दुचाकीवर त्रिपल शिट असा जीवघेणा प्रवास केल्याचे चित्र दिसत आहे. या मुलांबरोबर असलेले शिक्षकांनी रिक्ष्याच्या, टमटम तसेच टेम्पोच्या केबिन मध्ये बसून प्रवास केला तर विद्यार्थी हे वाहनाच्या पाठीमागील हौद्यात तसेच हुडावर बसल्याचे चित्र रस्त्याने दिसून येत होते.
विद्यार्थ्यांच्या या जीवघेण्या प्रवासाकडे पालकांनी तसेच शिक्षकांनी दुर्लक्ष केल्याने भविष्यात एखादी अघटीत घटना घडली तर याला जबाबदार कोण ? शिक्षक की पालक परीक्षेसाठी जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेकडे पालकानी दुर्लक्ष केल्याने नियोजन करणाऱ्या शिक्षकांनी कमी प्रवास भाड्या साठी मुलांना टमटम, टेम्पो, रिक्षा या सारख्या वाहनातून प्रवास करविला असल्याने कोणतीही अघटीत घटना घडू नये या साठी सजग नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.