राज्यात पुढचे चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता, IMD चा इशारा

0 801

नवी मुंबई – मागच्या महिन्यात राज्यात जोरदार मुसळधार पावसाने संपूर्ण राज्याला जवळपास झोडपून काढले होते. या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले आहे. माञ आता मान्सून परतीच्या मार्गावर असला तरी अद्याप महाराष्ट्रसह इतर काही राज्यात पावसाचा जोर कायमच आहे यातच हवामान खात्याने महाराष्ट्रासह सहा राज्यांना येणाऱ्या चार ते पाच दिवसांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शुक्रवारी अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकातील किनारपट्टी भाग, केरळ आणि पुद्दुचेरी येथील माहे येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व भागात 9 ऑक्टोबरला देखील मुसळधार पाऊस पडू शकतो. या राज्यांव्यतिरिक्त, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही 10 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाला असला तरी सप्टेंबरमध्ये त्याची उणीव भरुन निघाली कारण सप्टेंबरमध्ये 135 टक्के रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. मागच्या दोन दिवसांपासून मुंबईसह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस होत आहे. आहे.  

 हे पण पहा – धक्कादायक.. अल्पवयीन मुलीचे अपहरण

Related Posts
1 of 1,505

पुढील पाच दिवस राज्यात विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट अधिक असणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 10 ऑक्टोबरनंतर पुढील चार ते पाच दिवसांत हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. याचा परिणाम म्हणून 10 ऑक्टोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुव्वाधार पाऊसाची शक्यता आहे.

चाकूचा धाक दाखवून दागिने लुटणाऱ्या आरोपीला अटक, परराज्यात जाऊन पोलिसांची कारवाई

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: