धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; आता ..

0 946
The state government has taken a big decision regarding the noise at religious places; Now ..

प्रतिनिधी DNA मराठी टीम

मुंबई –   नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिक जिल्ह्यात भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई करणार असल्याचं आदेश  दिल्यानंतर आता  भोंग्यावरून राज्यात सुरु असलेल्या राजकारणात राज्य सरकारने (state government)मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. (The state government has taken a big decision regarding the noise at religious places; Now ..)

आता राज्यातील धार्मिक स्थळांवर भोंग्यांसाठी परवानगी बंधनकारक असणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय असल्याचं समजतंय.

दरम्यान आज पोलीस महासंचालक सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत धार्मिक स्थळांना भोंग्यांसाठी परवानगी अनिवार्य अंमलबजावणी बाबत स्पष्ट निर्देश दिले जाणार आहेत. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.

Related Posts
1 of 2,459

 नाशिक पोलीस आयुक्तांचे आदेश

नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी (Nashik Police Commissioner) भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हे आदेश दिले आहेत. मुस्लिम धर्मियांनी देखील भोंग्यांची परवानगी घ्यावी. अजाणपूर्वीं 15 मिनिटं आणि 100 मीटर लांब हनुमान चालीसा लावता येईल, असे आदेश काढण्यात आला आहे.

नाशिकमधील 3 मे पर्यंत मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार असल्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी काढले आहेत. तसंच त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यात नमूद केलंय.  मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी नाही, असं नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आदेश दिला आहे. त्याशिवाय, कोणाला हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. सर्वच धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार, असल्याचं त्यांनी आदेशात स्पष्ट केलं आहे.(The state government has taken a big decision regarding the noise at religious places; Now ..)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: