तथाकथित नेत्याने मागितली पन्नास लाखांची खंडणी.! काय आहे श्रीगोंद्यातील हे प्रकरण.?

0 442

श्रीगोंदा :-  श्रीगोंदा तालुक्यात भारत सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या गॅस पाइपलाइनच्या कामात तालुक्यातील एका तथाकथित नेत्याने गॅस पाइपलाइनच्या ठेकेदाराकडे ५० लाखाची खंडणी मागितली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तो खंडणी बहाद्दर तथाकथित नेता कोण.? या खंडणीबहाद्दर तथाकथित नेत्याचा लवकरच भांडाफोड करणारं…… आपलाच बाळासाहेब नाहाटा संचालक, महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघ, महाराष्ट्र राज्य…(The so-called leader demanded a ransom of Rs 50 lakh! What is the matter ?)

अशाप्रकारे एक मेसेज कालपासून सामाजिक माध्यमावर व्हायरल होत आहे. एका जिम्मेदार पदाधिकाऱ्याने याबाबत वक्तव्य केले आहे. तसेच, लवकरच या विषयाचा भांडाफोड करणार असून, त्या तथाकथित नेत्यांची नावे जाहीर करणार असल्याचे त्यांनी त्या मेसेज मध्ये नमूद केले आहे.

श्रीगोंदा – औरंगाबाद दरम्यान इंडियन ऑईल कार्पोरेशन मार्फत चालू असलेल्या गॅस वितरकेचा एक वाल्व श्रीगोंदा शहरांमध्ये वितरकांमार्फत घरपोच गॅस उपलब्ध करून देणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. श्रीगोंदा तालुका कार्यक्षेत्रातील अनेक गावांतून जाणाऱ्या या गॅस पाईप लाईनला गावपातळीवर नागरिकांचा विरोध झालेला आहे. या पाईप लाईनसाठी लोकांच्या जमिनी अधिग्रहित करीत, हे काम पुढे जाणार आहे.

अनेकांनी यासाठी आंदोलने केलेली आहेत. यातच काही नेते या सर्व प्रक्रियेचा व तयार वातावरणचा फायदा घेत असल्याचे या मेसेजच्या माध्यमांतून निदर्शनास येत आहे. सरळसरळ कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा हा प्रकार दिसतो आहे. बाळासाहेब नाहाटा यांनी काल त्यांच्या व्हाट्सअपच्या माध्यमातून तालुक्यातील विविध लोकांपर्यंत या तथाकथित नेत्याने खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आणून दिला आहे. पण, नेता कोण .? त्याचे नाव त्यांनी जाहीर केलेले नाही. ते नाव लवकरच जाहीर करणार असे त्यांनी त्या मेसेज मध्ये नमूद केले आहे. या प्रकरणाबाबत सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे.

Related Posts
1 of 1,512

पोलिसांनी केले दरोडेखोर आरोपीला अवघ्या 2 तासात जेरबंद

समाजाची बांधिलकी असणारे नेते जर, समाजाचा व तालुक्यातील नागरिकांचा विश्वासघात करून स्व:हित साधण्याचा प्रयत्न करत असतील. तर, श्रीगोंद्याचे भवितव्य धोक्यात आहे. कोरोना साथ आजाराने सर्वांचे जनजीवन प्रभावित झाले आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे. हवामाणातील बदलामुळे पिकांचेही मोठे नुकसान होत, सर्वजण त्रस्त आणि बेहाल असतांना पीडितांच्या भावना आणि व्यथा जाणून घेण्याऐवजी नेते म्हणणारे अशा पद्धतीने पैसे उकळण्यात गर्क असतील तर, नागरिकांनी आपल्या अडचणी कोणाकडे मांडाव्यात.? हा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे. ५० लाख खंडणी मागणारा नेता कोण.? आणि काय आहे हे प्रकरण.? नहाटा यांनी खुलासा करावा.. अशीच तालुक्यातील सर्व नागरिकांची अपेक्षा राहील..(The so-called leader demanded a ransom of Rs 50 lakh! What is the matter ?)

 हे पण पहा –  आमदार निलेश लंके यांच्या कामाचं राज्यमंत्री आदिती तटकरेंकडून कौतुक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: