दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत, पाट्या कशा बदलणार? – इम्तियाज जलील

0 191

औरंगाबाद-    नुकताच राज्यसरकारने राज्यातील सर्व दुकानाच्या नाव मराठी मध्ये लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निणर्यावर आता राज्यतील वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी याचा श्रेय हे महाराष्ट्र सैनिकांचं असल्याचं म्हटलं आहे तर दुसकीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. (The shopkeeper does not have money for food at present, how can he change the boards? – Imtiaz Jaleel)

माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले मागच्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोनामुळे दुकानदार त्रस्त झाले आहेत. मोठा तोटा होत आहे. भविष्यात काय होईळ माहिती नाही, उद्या दुकाने आम्ही उघडू शकणार की नाही, लॉकडाऊन होणार का? अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जर सरकार सांगत असेल की दुकानांच्या पाट्या बदलायच्या आहेत. सरकारला मराठीवर इतकं प्रेम आहे तर मग सरकारने आपल्या तिजोरीतील पैशांनी जितकी दुकाने आहेत त्या सर्वांच्या पाट्या तुम्ही बदला.

राज्य सरकारने स्वखर्चातून राज्यातील दुकानांच्या पाट्या बदलून द्याव्यात अशी मागणी करत खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे की, दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार ?

“दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार?” त्या निर्णयानंतर अभिनेताने केला सवाल

 तर दुसरीकडे मराठी पाट्या लावण्याचा या निर्णयावर फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने सुद्धा विरोध केला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी म्हटलं, मराठी पाट्यांच्या सक्तीच्या विरोधात 2001 साली मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरुन या निर्णयाला स्टे देण्यात आला होता. आम्हाला मराठीचा अभिमान आहे पण दुकानाची मोठी पाटी ही इंग्रजीत असायला हवी की मराठीत हा दुकानदाराचा निर्णय आहे.

Related Posts
1 of 1,640

राज ठाकरे यांची प्रतिक्रिया 

दुकानावरील पाट्याही आता मराठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर  राज ठाकरे  यांनी ट्विट करत हे श्रेय केवळ महाराष्ट्र सैनिकांचं असल्याचं म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये. परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय गेतला. तेव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांना मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच असंही राज ठाकरेंनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे.(The shopkeeper does not have money for food at present, how can he change the boards? – Imtiaz Jaleel)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: