शहरातील अस्वच्छतेबाबबत समाजवादी पार्टीच्या वतीने मागच्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु

0 149
श्रीरामपूर –  सध्या शहरात पसरलेली कमालिकी अस्वच्छता त्यावर घन-कचरा ठेकेदाराची मनमानी आणि त्याची पाठराखण करणारे नगर पालिका प्रशासन याविरोधात सोबतच बेजबाबदार संबंधित घन-कचरा ठेकेदाराचा ठेका त्वरित रद्द करण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी श्रीरामपूर नगर पालिकेसमोर समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) वतीने उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्यासह तालुकाध्यक्ष आसिफ तांबोळी, शहराध्यक्ष अय्युब पठाण, तौफीक शेख, सलीम शेख,ज़करिया सैय्यद,अरबाज़ कुरैशी,रईस शेख, फैज़ान काजी, साद पठाण, इमरान शेख, अल्तमश शेख, भारत खंडागळे, मतीन शेख, अब्दुल सैय्यद, राजु शेख, मागच्या पाच दिवसांपासून उपोषणाला ( hunger strike) बसले आहेत.
शहरात सध्या जिकडे पहावे तीकडे घाण- कचराच दिसून येत असून नगर पालिके मार्फत ज्या मर्जीतील ठेकेदारास या घनकचऱ्याचा ठेका देण्यात आला आहे तो शहरातील घान-कचऱ्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही,त्यावर संबंधित नगर पालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यास काही नगरसेवक, नगराध्यक्षा आणि नगर पालिका प्रशासन शहरातील नागरीकांच्या सामाजिक आरोग्याचा ज्वलंत प्रश्न सोडून संबंधित ठेकेदाराचीच पाठराखण करण्यात धन्यता मानत आहे.
शहरातील नागरीकांचे केवळ मतदानापुरतेच उपयोग करणारे आणि प्रत्येक्षात मात्र कधी आपल्या प्रभागात तोंड न दाखवणारे काही नगरसेवक स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून केवळ उद्घाटन फोटोतच मिरवून घेताना दिसून येत आहे,मात्र शहरातील अस्वच्छतेमुळे संभव्य पसरणाऱ्या रोगराईचे त्यांना काहीच घेणे-देणे नाही अशा बेजबाबदार नगरसेवकांना येत्या निवडणुकीत शहरातील जागरुक जनता योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे जरी सत्य असले तरी, हल्ली शहरातील अस्वच्छता रोगराईस निमंत्रण देत असून यावर तात्काळ नगर पालिकेचे लक्ष केंद्रित व्हावे यासाठी समाजवादी पार्टीच्यावतीने नगर पालिकेसमोर आमरण उपोषण केले जात आहे.
शहरातील स्वच्छतेकडे नगर पालिकेने दुर्लक्ष करावे आणी राजकीय पक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्यांना शहरातील अस्वच्छतेबाबत उपोषण करण्याची वेळ यावी हे शहरवासियांचं अत्यंत दुर्देव म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शहरातील नागरीकांच्या सामाजिक आरोग्याचा ज्वलंत प्रश्न असल्याने आपले गट, तट, पक्ष,संघटना या सर्व बाबी बाजूला ठेवून सर्वांनीच जनतेच्या आरोग्यप्रश्नी आवाज उठविणे आज गरजेचे ठरत आहे, म्हणून या उपोषणास कामगार नेते नागेशभाई सावंत,करण ससाणे, संजय छल्लारे, तिलक डूंगरवाल, राजेंद्र सोनवणे,सागर दुपाटी रज्जाक पठाण,फिरोज पठाण, जावेद तांबोळी, अबुल मान्यार रियाजखान पठाण,सोनो सैय्यद, सलिम शेख,अजय जनवेजा, नितिन बनसोडे, शेख शाकिब, रईस शेख, अभिजित सोनवणे, तौफीक शेख, फैज़ान काज़ी, अब्दुल सैय्यद, शेहेजाद शेख, अ.भा.कॉंग्रेस पार्टी,आमआदमी पार्टी,भारती लहूजी सेना, प्रहार जनशक्ति,अलफतेह ग्रुप,जे. जे. फाऊंडेशन, आशा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा भरघोस पाठिंबा मिळत असल्याने संबंधित नगर पालिका प्रशासनास शहरातील ज्वलंत नागरी समस्यांकडे लक्ष देणे भाग पडणार असल्याचेही यावेळी जोएफ जमादार यांनी सांगितले.

 

Related Posts
1 of 1,640
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: