शंकराच्या मुर्तीची विधीवत पुजा ,विंचरणेच्या तिरावर २१ फूट उंचीची शंकराची मूर्ती

0 8
जामखेड –  जामखेडची गटार अशी ओळख बनलेल्या विंचरणा नदीचे पुनरुज्जीवन केल्यानंतर आ.रोहित पवार यांनी या नदीच्या तिरावर भगवान शंकराच्या २१ फूट उंचीच्या आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करुन नदीच्या आणि शहराच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. जामखेड शहरातील २१ जोडपे आणि स्वच्छतेसह विविध सामाजिक कामात आपल्या आमदार मुलाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे रोहित पवार यांचे आई-वडील या सर्वांच्या हस्ते विधीवत पूजा करून या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

 

प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारलेल्या श्री भगवान शंकराच्या या आकर्षक मूर्तीमुळे जामखेड शहराचं रूप पालटण्यास निश्चितच मदत झाली आहे. आमदार म्हणून निवडून आल्यापासून रोहित पवार यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे हाती घेतली. झाडा झुडपांनी वेढलेल्या आणि कचऱ्याने भरलेल्या जामखेडच्या विंचरणा नदीच्या साफसफाईचं आणि गाळ काढण्याचं काम प्राधान्याने हाती घेऊन गटारीचं स्वरूप आलेल्या नदीचा गुदमरलेला श्वास मोकळा केला. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, विंचरणा नदीची साफसफाई केल्यानंतर येत्या काळात सुशोभिकरणाचेही काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ”प्रत्येक नदी ही गंगेसमान असते. त्यामुळं तिचा सन्मान करणं हे प्रत्येकाचे कर्तव्य असते आणि या नद्या स्वच्छ ठेवणे म्हणजेच आपलं कर्तव्य पार पाडण्यासारखे आहे. माणसाचं मन हेही गंगेसारखं निर्मळ असावं, अशी अपेक्षा आपण बोलताना अनेकदा व्यक्त करत असतो.
मग आपल्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येक नदीही निर्मळ का असू नये, असा प्रश्न मला नेहमी पडायचा. वास्तविक सर्वच नद्या या निर्मळ आणि प्रदूषणमुक्त होत्या, परंतु आपणच अक्षम्य दुर्लक्ष करत त्यांना प्रदूषित केलं हे मान्य करून त्यांना पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यासाठी अनेक जणांची साथ मिळाली, याबाबत मी सर्वांचा आभारी आहे. येत्या काळात सर्वांच्या साथीने अशीच नागरिकांच्या हिताची आणि विकासाची कामं करायची आहेत. त्यासाठीही सर्वजण असंच सहकार्य करतील, असा विश्वास आहे.’

 

Related Posts
1 of 1,290

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून या ज्येष्ठ मंत्र्याच्या नावाची चर्चा

यावेळी पांडुरंग शास्त्री देवा, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोठारी, ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, दत्तात्रेय वारे, माजी सभापती सुभाष आव्हाड, शिल्पकार प्रमोद कांबळे, उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, नगरसेवक दिगंबर चव्हाण, पवन राळेभात यांच्यासह स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: