“या” अधिकाऱ्याच्या बदलीने अनेकांना अश्रू अनावर,अक्षरशः फुलांचा वर्षाव

0 509

अहमदनगर –  वरीष्ठ अधिकार्‍यांची बदली झाली की त्यांच्या कडे पाठ फिरवल्याची अनेक उदाहरणे आपण पाहीली पण कर्जत तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांच्या बदलीची कल्पनाच कर्मचाऱ्यांना खरी वाटली नाही. त्यांना निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले अक्षरशः फुलांचा वर्षाव करत जड अंतःकरणाने  निरोप दिला.(The replacement of “this” officer brought tears to the eyes of many, literally a shower of flowers)

कर्जत तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी कर्जत येथे तीन वर्षे काम केले. ही तीन वर्ष कशी गेली हे कर्मचारी व अधिकाऱ्यांना समजलेच नाही. निरोपंच द्यायचा तर जड अंत:करणाने का गोड शुभेच्छांनी द्यावा अशांच पेचात आम्ही सापडलोय. आज खरोखर निशब्द आहोत आम्ही. आपणास सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला कणखर अधिकारी म्हणावं की  हाताखालील कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेत पाठीवर थाप टाकून लढ म्हणणारा दिलदार बॉस म्हणावं अशा संशयकल्लोळात आमचं मन आजही रुंजी घालतंय यापूर्वीही अनेक अधिकारी आले, लोकाभिमुख योजना त्यांनीही राबविल्या परंतु कर्मचाऱ्यांच्या मागे ठाम राहून “लोकाभिमुख प्रशासन” राबविणारा अधिकारी फक्त तुम्हीच होतात. कर्मचाऱ्यांवर धाक ठेवून काम करून घेण्यापेक्षा कर्मचाऱ्यांना आपलेसे करून काम करून घेणे यातंच आपण खरेतर धन्यता मानली सतत कर्मचाऱ्यांच्या समवेत राहून, त्यांचे सुख- दुःख वाटून घेऊन, त्यांच्यात रमून त्यांना आपल्यातीलंच एक आहे अशी आपुलकीची भावना निर्माण करून एक वेगळीच छाप आपण त्यांच्या हृदयावर कोरलीय. उद्या आपण त्या खुर्चीत बसलेला नसताल… ही कल्पनाच आमच्या वेड्या मनाला अजूनही स्पर्श करत नाही.

तुमचे आणी आमचे नाते जसे ‘हात आणि डोळे’. हाताला लागलं तर डोळ्याला पाणी येतं आणि डोळ्यातील पाणी पुसायला पुन्हा हातालांच वर यावं लागतं… आज अशा नात्याला स्वल्पविराम  मिळतोय. काम करण्याची वेगळी ऊर्जा घेऊन आपण काम करंत होतात. आपल्या कामाची
करंत होतात. आपल्या कामाची शिदोरी घेऊन आम्ही पुढील वाटचाल करत राहू.आपल्या सर्व स्टाफ च्या मागे धावून जाणारं आपलं व्यक्तिमत्व उद्या आमच्यात कार्यरत राहणार नाही परंतु भविष्यात आमच्या हाकेला तुम्ही नक्कीच ‘ओ’ देताल अशी आशा आम्ही बाळगून आहोत .

Related Posts
1 of 1,481

धक्कादायक ! मुलाची हत्या करुन आईने लपवला घरामध्येच मृतदेह ...

आपल्या कामाबद्दल बोलायचे झाले तर खूप काही बोलता येईल. शेवटी मी एवढेच म्हणेल की… आदमी ना कद से बडा होता है .. ना पद से बडा होता है ! जो आदमी दूसरों के मुसीबतों मे खडा होता है ..वो सबसे बडा होता है(The replacement of “this” officer brought tears to the eyes of many, literally a shower of flowers)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: