गुटख्यातले खरे सूत्रधार पोलिसांच्या आशीर्वादाने मोकाटाच ?

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील काष्ठी रोडवर दि 8 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात गुटखा कारवाई केली असल्याचे पोलिसांनी पोलीस खात्यासह सर्वाना दाखविले मात्र टिकेची झोड उठल्यावर प्रशासनामध्ये खळबळ उडाली त्यात काही कर्मचार्यांच्या बदल्याही करण्यात आल्या मात्र गुटखा प्रकरणातील खरे सूत्रधार अजूनही पोलिसांच्या आशीर्वादाने मोकटाच फिरत असल्याचे बोलले जात आहे.
श्रीगोंदा तालुक्याची पूर्वी उसाचे आगार म्हणून ओळख होती ती पुसून आता गुटख्याचे आगार म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे कारण सर्वात मोठी गुटख्याची आवक जावक श्रीगोंदा तालुक्यात होत आहे त्यामुळे यात अगदी पोलिसच नव्हे तर अनेक लोकांचे हेच धंदे आहेत त्यांना आशीर्वाद पोलिसच देतात तर काही पोलीस चक्क गुटखा व्यापारात भागीदारी घेऊन व्यवसाय जोमात सुरू केले आहेत.
यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे असे चित्र दिसत आहे कर्नाटक मधून गुटखा निघाल्यानंतर अगदी तो श्रीगोंद्यात येईपर्यंत त्या गुटखा गाडीवर लाखोंची उधळण केली जाते सर्वात जास्त गुटखा वाहतूक सोलापूर नगर या महामार्गावरून होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे मात्र रस्त्याने लागणाऱ्या सर्व ठिकाणी लक्ष्मी कृपा झाली कि गाडी पुढील ठिकाणी सुरळीत पोहचते असेच काहीसे गुणचक्र या व्यावसायिकांचे दिसून येत आहे. कर्नाटक मधून आलेला माल विविध ठिकाणी खाली केला जातो म्हणजे एक ट्रक 4 ठिकाणी खाली होतो तेथून तालुक्यातील ढोक विक्रेते यांना माल पीक अप मधून पाठवला जातो त्यानंतर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात अगदी दुचाकी तीनचाकी मधून गावोगावी गुटखा पोहचविला जातो असे अनेक गुटख्याचे ट्रक आठवड्याला तालुक्यात येत आहेत.
याला फक्त आशीर्वाद पोलिसांचा आहे असे खुलेआम बोलले जात आहे त्यामुळेच गुटखा प्रकरण होऊन तब्बल 1 महिना उलटला तरीही गुटख्यातले खरे सूत्रधार पोलिसांच्या आशीर्वादाने मोकाटाच ? आहेत असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
अधिकाऱ्यांच्या बैठका कश्यासाठी ?
गुटखा प्रकरणात पोलिसांची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली आहे तसेच एका पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई पण झाली आहे त्यामुळे आता हे प्रकरण थांबवावे अशी विनंती एका हॉटेल मध्ये बसून एका पोलीस अधिकाऱ्याने एका व्यक्तीला केली आहे मात्र प्रकरण मिटत नसल्याचे लक्षात आल्यावर पोलीस अधिकाऱ्याने तेथून रागाने काढता पाय घेतला.