दिड वर्षात प्रकल्प पूर्ण होईल. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सुचनेवरून पोलीसांच्या घरासाठी अर्थसंकल्पात ३७५ कोटी निधी – गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई

0 9

जामखेड – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात पोलिसांच्या घराची अवस्था सुधारली पाहिजे. यासाठी पुढाकार घेतला त्यामुळे ३७५ कोटी रूपये उपलब्ध केले कोरोना मुळे निधी पडून होता तो कमी झाल्यानंतर मोजक्याच आमदारांनी निधी मिळावा यासाठी प्रयत्न केला त्यामध्ये आ. रोहीत पवार होते त्यांनी सर्व प्रस्ताव तयार केला त्यामुळे कर्जत जामखेड तालुक्यात साडेपंधरा कोटी निधी पोलिसांच्या घरांना मिळाला त्यांची कार्यतत्परता दिसून आली व तुम्ही चांगला लोकप्रतिनिधी निवडला असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी केले.
जामखेड पोलिस स्टेशनच्या प्रांगणात
पोलीस निवासस्थानाचे भूमिपूजन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. रोहीत पवार, गृह विभाग बांधकाम अधिक्षक अभियंता श्रीमती दिपाली भाईक, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, तालुकाप्रमुख संजय काशीद, कॉग्रेस तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल उगले, प्रा. लक्ष्मण ढेपे, नगराध्यक्ष निखिल घायतडक, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, मंगेश आजबे दादासाहेब रिटे, झुबेर शेख, बिभीषण धनवडे, कॉन्ट्रॅक्ट हर्षद सारडा आदी उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई म्हणाले, जामखेड येथे येत असताना आ. रोहीत पवार यांनी पुढील साडेतीन वर्षांत मतदारसंघात काय करायचे याचा रोडमॅप मला दाखवला यावरून आ. पवार यांची कर्जत-जामखेड मतदार संघासाठी दूरदृष्टी आहे जिद्द व चिकाटी आहे. मतदारसंघासाठी काम कसे करायचे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांना कुणाच्या वशिल्याची गरज नाही. ते स्वतःच कामे मंजूर करून आणतात त्यामुळे तुम्हाला काही कमी पडणार नाही
आ. रोहीत पवार म्हणाले, पोलीस प्रशासनाने चांगले काम करावे त्यांचे मनोधैर्य वाढले पाहिजे यासाठी ब्रिटिश कालीन गळक्या इमारतीतून त्यांना चांगल्या दर्जाचे घर उपलब्ध व्हावे यासाठी गृहखात्याकडे प्रस्ताव दाखल करून निधी मिळवला आहे दिड वर्षात इमारत पूर्ण होईल यापुढील काळात बदली होऊन येणाऱ्या पोलिसांना अद्यावत घर मिळेल तसेच
जिल्हा पोलिस दलासाठी आगामी काळात २० वाहने सरकारने उपलब्ध केली आहेत. महिलांसाठी भरोसा सेल मतदारसंघात स्थापन करून भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुका दहशतमुक्त करण्यात आल्याने तेथे सत्ताबदल झाला आहे. कर्जत-जामखेडसाठी सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध करण्याची मागणी देसाई यांच्याकडे करण्यात आली.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले यावेळी तालुका पत्रकार संघाने भास्करराव पेरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे केली असता त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना सुचना दिल्या. पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी आभार मानले.

Related Posts
1 of 1,321
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: