कोळगाव येथील रखडलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न लागला मार्गी

0 12
श्रीगोंदा –   तालुक्यातील कोळगाव येथील मागील ३ वर्षापासून रखडलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांची सामाजिक कार्यकर्ते सुधीर सयाजीराव लगड व दादासाहेब लगड यांनी भेट घेत लक्ष वेधले असता ना.टोपे यांनी प्रशासकीय मान्यता तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी मार्च 2021 पर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
  तालुक्यातील कोळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला परवानगी मिळाल्यानंतर  २८ मे २०१८ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे पाठविलेल्या इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखड्या नुसार २१ जानेवारी २०२१ रोजी अंदाजपत्रकानुसार निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते.

  कोळगाव येथील गायरान क्षेत्रावर अज्ञात व्यक्तीने लावली आग… 

मात्र मार्च २०२१ रोजी आलेल्या कोरोना या जागतिक महामारी मूळे निधी उपलब्ध झाला नसल्याने रुग्णालयाच्या इमारतीचे काम रखडले होते. मागील ३ वर्षापासून रखडलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांची कोळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर सयाजीराव लगड व दादासाहेब लगड यांनी २ फेब्रुवारी रोजी भेट घेउन लक्ष वेधले असता ना.टोपे यांनी संबंधित विभागाला प्रशासकीय मान्यता तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी मार्च 2021 पर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिल्याने कोळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागल्याचे सुधीर लगड यांनी सांगीतले.
Related Posts
1 of 1,291
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: