राज्यात पुन्हा अवकाळी पाऊसाची शक्यता; अहमदनगरसह ‘या’ जिल्ह्यात पडणार वादळी पाऊस

मुंबई – भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागात 21 आणि 22 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ(Vidarbha), दक्षिण मध्य महाराष्ट्र(South Madhya Maharashtra), दक्षिण कोकण (South Konkan) आणि मराठवाडा (Marathwada) मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
या अंदाजानुसार येत्या 22 एप्रिल रोजी रायगडमध्ये हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह सरींची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
गुरुवारी कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी अहमदनगर आणि पुणे येथे मेघगर्जनेसह पाऊस पडेल. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया येथे शुक्रवारीही मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.