इंग्लंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यासाठी सूर्यकुमार बरोबर या खेळाडूला पहिल्यांदा संघात स्थान

0 10
 नवी मुंबई –  भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी आज बीसीसीआयने भारताच्या 18 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या संघात भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या दरम्यान झालेल्या चौथ्या टी- ट्वेन्टी सामन्यात आपल्या अप्रतिम फलंदाजीने सर्वांच्या मन जिंकणारा फलंदाज सूर्यकुमार यादवला भारतातर्फे एक दिवसीय सामन्यात पर्दापण करण्याची संधी देण्यात आली आहे . तर सुर्यकुमार बरोबरच कर्नाटकच्या वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला सुद्धा पहिल्यांदा संघात निवडण्यात आले आहे.

तर रिषभ पंत, कुणाल पांड्या, मोहम्मद सिराज आणि भुवनेश्वर कुमार यांचा संघात परत एकदा कमबॅक झाला आहे.तर दुसरीकडे या एकदिवसीय मालिकेसाठी पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडीक्कलला संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र या दोघांना संधी मिळाली नाही. या दोघांनी नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली होती. पृथ्वी शॉ एका स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तर देवदत्त सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता.

हा आहे इंग्लंड विरुद्ध  तीन एक दिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ – 
Related Posts
1 of 47

बोठेने सांगितला घटनाक्रम , मात्र हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट.. 

तीन एकदिवसीय मालिकेच्या वेळापत्रक

पहिला सामना 23 मार्च

दुसरा सामना 26 मार्च

तिसरा सामना 28 मार्च

सर्व सामने पुणे मधील गहुंजे स्टेडियम वर दुपारी एक वाजून ३० मिनिटा पासून सुरू होणार आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: