राज्यात आपल्या अहमदनगर शहराला खड्ड्यांनी दिली नवीन ओळख…

0 278

प्रतिनिधी- सय्यद शाकीर 

अहमदनगर – देशासह संपूर्ण राज्यात आपल्या इतिहासासाठी ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे आपला अहमदनगर (Ahmednagar)  जिल्हा. हा जिल्हा राज्यातील 36 जिल्हे पैकी सर्वात मोठा जिल्हा. या जिल्ह्याच्या मुख्य केंद्रबिंदू म्हणजे अहमदनगर शहर (Ahmednagar city) . अहमदनगर शहराला मागच्या काही महिन्यापासून रस्त्यावर निर्माण झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांनी संपूर्ण राज्यात एक नवीनच ओळख दिली आहे. शहरातील मुख्य ठिकाणे असणाऱ्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे . या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे होणारी वाहतूकाची कोंडी हे  शहरातील नागरिकांना आता काही नवीन नाही.(The pits gave a new identity to our Ahmednagar city in the state …)

शहरामधील दिल्ली गेट, मुकुंदनगर , गोविंदपुरा , झेंडीगेट, जिल्हाधिकार्यालय परिसर, हतीमपुरा, पाचपीर चावडी, कोठला , नगर – मनमाड हाइवे , औरंगाबाद रोड, महानगरपालिका रोड, शासकीय विश्राम गृह, सावेडी नाका, आदी भागात रस्ते मध्ये खड्डे आहे की खड्ड्यामध्ये रस्ता याचा उत्तर महानगरपालिका प्रशासनाने द्यावे अशी विनंती परिसरातील नागरिक करत आहे.

हे पण पहा  –Shreegonda Lockdown | बेलवंडी सह 6 गावे पुन्हा ”लॉक डाऊन”

Related Posts
1 of 1,603

शहरातील सामान्य नागरिकांसह राजकीय पक्षांनी देखील शहरात निर्माण झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांचा तत्काळ दुरुस्त करून नागरिकांना होणारे त्रासापासून महानगरपालिका ने सुटका द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र या मागणीचे महानगर प्रशासन किती गांभीर्याने दखल घेत नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून कधी सुटका करते याची वाटच पहावी लागेल.(The pits gave a new identity to our Ahmednagar city in the state …)

महिला पदाधिकार्याच्याय मद्यपी पतीचा धुडगूस…  प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न…

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: