गुलमोहररोडवरील महावितरणचा खांब जीवघेणा….
गुलमोहर रोडवर महावितरण कंपनीचा एक खांब धोकादायक बनला

अहमदनगर : शहरातील गुलमोहर रोडवर महावितरण कंपनीचा एक खांब धोकादायक बनला आहे. रस्ता रुंदीकरणानंतर हा खांब रस्त्यावर आला. वास्तविक तो तातडीने हलवायला पाहिजे.
मात्र, त्यासाठी खर्च व तांत्रिक मुद्दे उपस्थित होत असल्याने त्याच्यासह अन्य खांबही रस्त्यावरच राहिले आहेत. त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आलेला असून एखाद दोन बळी गेल्यानंतर तो खांब हलविणार का असा सवाल केला जात आहे.
दूध भेसळीचे अड्डे चालवणाऱ्यांविरुद्ध पोलिस अनेकदा अन्नसुरक्षा आणि मानके कायदा (एफएसएस) लावत नाही
शहरातील गुलमोहर रोडवर महावितरण कंपनीचा एक खांब धोकादायक बनला आहे. रस्ता रुंदीकरणानंतर हा खांब रस्त्यावर आला. वास्तविक तो तातडीने हलवायला पाहिजे. मात्र तो हलविला जात नाही. यामुळे तेथे सतत अपघात होत आहेत. किशोर ऑइल्स दुकानापुढील खांब तर सर्वाधिक धोकादायक ठरत आहे. तेथे अनेक अपघात झाले आहेत.
वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना अचानक आडवा येणारा हा खांब लक्षात येत नाही. त्यामुळे वाहने त्यावर जाऊन आदळतात. आठवड्यातून एक-दोन तरी अपघात तेथे हमखास होत आहेत. यामुळे अनेकांना गंभीर स्वरुपाच्या दुखापती झालेल्या आहेत.
Soldier came to help :- आरडाओरडत झाला सैनिक मदतीला धाऊन आला
दुकानदार व रहिवाशांनी यासाठी महापालिका व वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केला. मात्र, उपयोग झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी येथे आणखी एक अपघात झाला. वेगाने आलेला टेम्पो खांबवर धडकून पलटी झाला. चालकासह तिघे थोडक्यात बचावले. प्रशासन येथे कोणाचे बळी जायची वाट पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.