वातावरणातील बदलावर आधारित शेती करण्याची गरज :-सुनिल मुरलीधरन

0 122
अहमदनगर :-   वातावरणात होणाऱ्या हवामानातील बदलावर आधारित शेती करणे ही आता काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन होगनास इंडिया प्रा.लि. या कंपनीचे एम. डी. सुनिल मुरलीधरन यांनी केले.
नवजीवन प्रतिष्ठान समन्वयीत व वाघळूज ग्रामस्थांच्या पुढाकारातून होगनास इंडिया प्रा.लि. च्या अर्थसहाय्याने आष्टी तालुक्यातील हरितग्राम वाघळूज प्रकल्पांतर्गत पाझर तलाव, जलपूजन व लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. होगनास चे संचालक डॉ. शरद मगर, एच. आर. मॅनेजर सुभाष तोडकर, नवजीवन प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्र पवार, वाघळूज चे सरपंच कांतीलाल गटकळ, उपसरपंच अजय गुंड, सभापती संतोष गुंड, डॉ.अनिल गुंड, अॅड. हनुमंत थोरवे, प्राचार्य शिवराम जाधव आदी यावेळी विचारपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सुनिल मुरलीधरन पुढे म्हणाले की, वाघळूज च्या विकासाकरिता होगनास कंपनीने खारीचा वाटा उचलला आहे. मात्र नवजीवन प्रतिष्ठान व वाघळूज चे ग्रामस्थ, शेतकरी व युवक अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करीत आहेत. हे पाहून मला खूप आनंद झाला. त्याच बरोबर अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.
होगनास चे संचालक डॉ. शरद मगर म्हणाले की, वाघळूज सारख्या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी होगनास कंपनीच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.  नवजीवन प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्र पवार म्हणाले की, नवजीवन प्रतिष्ठान व वाघळूज ग्रामस्थांच्या पुढाकारातून होगनास कंपनीच्या अर्थसहाय्याने वाघळूज येथील पाझर तलावातील गाळ काढणे, तलावाचे खोलीकरण करणे, आच्छादन करणे, आंबा लागवड व वृक्षारोपण ही कामे करण्यात आली. मात्र अगामी काळात वाघळूज परिसरात जल, जंगल, जमीन, जनावरे व इथली जनता या ५ घटकांसाठी काम करणे अत्यंत गरजेचे आहे.
Related Posts
1 of 1,603
सकाळी ९ वा. वाघळूज मध्ये सर्व मान्यवरांचे आगमन झाले. वाघळूज येथील पाझर तलावाच्या कामाची पाहणी, जलपूजन, आंबा लागवड प्रकल्प, वृक्षारोपण, दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन नवजीवन प्रतिष्ठान व वाघळूज ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.  मेन रोड ते कैकाडी महाराज विद्यालयापर्यंत मान्यवरांची सजवलेला रथ व बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. वाघळूज ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच कांतीलाल गटकळ, उपसरपंच अजय गुंड, सभापती संतोष गुंड यांचीही भाषणे झाली.
डॉ. अनिल गुंड यांनी प्रास्ताविक केले. भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. जालिंदर गुंड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण गुंड, सचिन गुंड, राजू चितळे, ज्ञानदेव मोहिते, नितीन पिंगळे, नवजीवन चे संदिप पालवे, बाळू गुंड, संजय गुंड, दत्तोबा गुंड, बंडूशेठ गुंड आदींनी परिश्रम घेतले.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: