स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला राष्ट्रवादी देणार मोठा झटका ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

0 1,574

नवी मुंबई –  महाविकास आघाडी (MVA) सरकार मधील घटक पक्ष असलेला काँग्रेस (Congress) ने महानगर पालिका नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका  स्वबळावर लढणार असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) यांनी जाहीर केला आहे. नाना पटोले यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. (Will the NCP give a big blow to the Congress which is fighting on its own? Learn the complete information)

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ने देखील स्वबळाचा नारा देत आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly elections) काँग्रेसला मोठा झटका देण्याची तयारी करत आहे. एनसीपी नेत्यांच्या एक वर्ग ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी (AAP) यांच्यासोबत गोव्यात तिसऱ्या आघाडीसाठी चर्चेचा सल्ला देत आहेत.

राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं सांगितलं, आम्ही ऐकले आहे की गोव्यातील काँग्रेस नेते त्यांच्या निवडणुकीच्या रणनीतीवरुन आपसात वाद घालत आहेत आणि AICC आतापर्यंत ते वाद सोडवण्यात असमर्थ राहिली आहे. राष्ट्रवादीने खूप वाट पाहिली आहे, पण आम्ही अंतहीन वाट पाहू शकत नाही.

Shakti Mill Gangrape., हायकोर्टाचा मोठा निर्णय , आरोपींची फाशीची शिक्षा रद्द

Related Posts
1 of 1,518

पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाओ यांच्यासह गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी टीएमसीसोबत युतीसाठी चर्चेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, शरद पवार भाजपविरोधी आणि बिगर काँग्रेस तिसरी आघाडी करण्याची शक्यता आहे. ज्यात TMC, AAP, NCP आणि इतरांचा समावेश असेल.

राव यांनी नुकतंच सांगितलं होतं की, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) आणि महाराष्ट्र गोमंतक पार्टी (MGP) यांच्याशी युती करण्यासाठी चर्चा करेल. मात्र गोव्यातील अनेक वरिष्ठ काँग्रेस नेते राष्ट्रवादी आणि GFP सोबत युती करण्याबाबत विभागले आहेत. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस स्वबळावर चांगली कामगिरी करू शकते, असं राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीला विरोध करणाऱ्यांचे मत आहे.(Will the NCP give a big blow to the Congress which is fighting on its own? Learn the complete information)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: