प्रियकराच्या नावाचा कुंकू लावल्याने आईने केली मुलीची हत्या

0 365

लखनऊ –  उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील वैदपुरा गावात आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आईने आपल्याच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आपल्या मुलीचे असणारे प्रेमसंबंध मान्य नसल्याने तिने आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केली.

या प्रकरणात मिळालेली माहिती अशी की इटावा जिल्ह्यातील वैदपुरा गावात प्रियंका नावाच्या मुलीचं राजकुमार नावाच्या तरुणावर प्रेम होतो. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रियंकाच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण प्रियांका आपल्या निर्णयावर ठाम होती.

हे पण पहा –  आमदार निलेश लंके यांच्या कामाचं राज्यमंत्री आदिती तटकरेंकडून कौतुक

प्रियंका आणि तिची आई निर्मला देवी बाजारात गेल्या असता बाजारातून घरी आल्यानंतर प्रियंकानं कुंकू घेतलं आणि ते लावलं. आईने कुंकू का लावला विचारले तेव्हा आपण आपल्या प्रियकराच्या आणि होणाऱ्या पतीच्या नावे हे कुंकू लावत असल्याचं तिनं सांगितलं. यानंतर निर्मला देवीने रागाच्या भरात मुलीचा गळा दाबून खून केला आहे.

Related Posts
1 of 1,603

त्यांनतर आईने मुलीचा हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह फासावर लटकावला आणि हत्येचा बनाव रचला. प्रियंकाला त्रास देणारा गावातील राजकुमार नावाचा तरुण आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रियंकाचा खून केल्याचा आरोप प्रियांकाच्या आईने केला. प्रियंकाच्या वडिलांनी तशी रितसर तक्रारसुद्धा नोंदवली. पोलिसांनी तीन पथकं तयार करून या घटनेचा तपास सुरू केला. तपास करत असताना प्रियंकाच्या डोक्यावरील कुंकू पाहून पोलिसांना संशय आला. त्यातूनच आईनेच तिची गळा दाबून हत्या केल्याचं उघडकीस आले.

विजय वडेट्टीवार म्हणतात तर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायला तयार आहोत

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: