पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची भेट, राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना जोर 

0

नवी दिल्ली –   मागच्या काही दिवसापासून राष्ट्रीय राजकारणात भेटीगाठी सुरु असून राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आले आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor)  यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबर दोनदा भेट झाली तर मागच्या दोन तीन दिवसापूर्वी प्रशांत किशोर आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांची भेट झाली होती. याभेटी नंतर शरद पवार यांना राष्ट्रपती उमेदवार घोषित करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. (The meeting between Prime Minister Modi and Sharad Pawar, many discussions in political circles)

तर आता देशाचे (Prime Minister Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांनी दिल्ली येथे भेट झाली आहे. या भेटी नंतर परत एखदा अनके चर्चाना उधाण आला आहे. मोदी आणि पवार यांच्यादरम्यान जवळपास तासभर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या दोन्ही नेत्यांची भेट कोणत्या मुद्द्यांवर झाली याची माहिती अद्याप समोर आली नाही तरीही राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना जोर आला आहे. महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

 

एसएससीने जाहीर केली जीडी कॉन्स्टेबलची बंपर भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Related Posts
1 of 1,184

ही भेट दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेली नसून ती साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली आहे. त्यामुळे संकेतांनुसार शासकीय कार्यालयात झालेल्या भेटीत राजकीय चर्चा होत नाही. मात्र, दोन्ही नेत्यांची तासभर चर्चा झाल्यामुळे या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसेल, हे मानण्यास राजकीय विश्लेषक तयार नाही .

काही दिवसांपासून देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा केली जात आहे. या मुद्द्यावरून स्थानिक भाजपाकडून देखील सातत्याने शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक शब्दांमध्ये टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये राष्ट्रपतीपदाविषयी देखील चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.(The meeting between Prime Minister Modi and Sharad Pawar, many discussions in political circles)

अनैतिक संबंधातून आठ वर्षीय मुलाची हत्या , आरोपीला अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: