लग्नला झाले अवघ्या 10 दिवस अन् नवरी आठ महिन्यांची गरोदर

0 726

लखनऊ – उत्तर प्रदेशच्या (UP) बरेली जिल्ह्यात (Bareilly district) एक विचीत्र घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.लग्ना (Marriage) नंतर अवघ्या दहा दिवसांनी नवरी आठ महिन्यांची गरोदर (Pregnant)असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण समोर येताच नवरदेवाच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार नवरदेव हा एका फुटवेअर दुकानात काम करतो. नवरदेव-नवरी हे दोघं एकाच परिसरात रहात आहेत. दोन्ही कुटुंबांच्या चर्चेनंतर त्यांचं लग्नाचं निश्चित झालं. त्यानुसार दोघांचं लग्नही पार पडलं. पण लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांनी नवरीच्या पोटात दुखायला लागलं. नवरीचे सासरचे तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टराने मुलीची तपासणी करुन जी माहिती दिली त्यानंतर तिच्या सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दहा दिवसांपूर्वीच घरात आलेल्या नव्या नवरीच्या पोटात आठ महिन्याचे बाळ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. संबंधित माहिती मिळाल्यानंतर सासरच्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्यासोबत फसवणूक झाली, अशी भावना त्यांच्या मनात आली. या दरम्यान ही माहिती वाऱ्यासारखी संबंधित परिसरात पसरली. लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांनी नवरी आठ महिन्यांची गर्भवती कशी असू शकते? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला.

परिसरातील काही नागरिकांनी नवरदेव तरुण आणि नवरी यांच्यात लग्नाआधीच प्रेमसंबंध होते, असा दावा केला. पण नवरदेव तरुणाने तो दावा फेटाळला. दुसरीकडे नवरदेवाचे कुटुंबिय चांगलेच संतापले आहेत. तरुणीचं लखनऊचा निवासी असलेल्या तिच्या बहिणीच्या दिरासोबत प्रेमसंबंध होते. त्याचाच मुलगा तिच्या गर्भात आहे, असा आरोप सासरच्यांनी केला आहे. तसेच तरुणी त्याच्यासोबतच तिचं लग्न करण्यास इच्छूक होती. पण तिच्या आई-वडिलांनी दबाव टाकून तिचं दुसरीकडे लग्न लावून दिलं, असाही आरोप नवरदेवाच्या नातेवाईकांनी केला आहे.

दरोड्याच्या तयारीत असलेले ४ जण पोलिसांच्या ताब्यात… मुद्देमालही जप्त..

Related Posts
1 of 1,481

तरुणीची मेडीकल चाचणी केली जाणार

दरम्यान, या प्रकरणावर पोलीस अधिकारी आशिष प्रताप सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुलीचे मेडीकल तपासणीचे देखील निर्देश आले आहेत. त्यामुळे खरं-खोटं समोर येईल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.

हे पण पहा  – Ahmednagar | सफर चंद्रा वरची | Ride is on the moon

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: