ATM कार्ड क्लोन करून फसवणूक करणा-या टोळीचा मुख्य आरोपीला अटक

0 236

अहमदनगर –   ATM कार्ड (ATM card ) क्लोन करून लाखोंची रक्कम ATM मशिनव्दारे काढून फसवणूक करणा-या टोळीचा मुख्य आरोपी सायबर पोस्टे कडून मिरारोड जि. ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक  मनोज पाटील , सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचे नेतृत्वाखाली पोसई प्रतिक कोळी पोहेको योगेश गोसावी, पोहेको उमेश खेडकर, पोना दिंगबर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते पोकी, अरुण सांगळे, गणेश पाटील चापोहेको वासुदेव शेलार या सायबर पोलीस स्टेशन यांचे पथकाने सदर गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषण करून गुन्हयाचे अनुषंगाने ATM मधील CCTV फुटेज ताब्यात घेवून त्याव्दारे आरोपींचा नगर – कल्याण रोडने पाठलाग करुन आरोपी धिरज अनिल मिश्रा , सुरज अनिल मिश्रा (रा नायगाव यांना टोकावडे ता ठाणे) येथून ताब्यात घेण्यात आले होते.

अधिक माहिती अशी कि  ११ मे २०२१ रोजी भिंगार पोलीस ठाण्यात दोन जणांचे एटीएम कार्ड क्लोन करून त्यांचे दुसरे एटीएम बनवून ते वेगवेगळया एटीएम मध्ये वापरून त्यामधुन १ लाख ४४ हजार रुपये  काढल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात माहीती तंत्रज्ञान अधि-२००० चे कलम ६६ (C) (D) सह ४२०,४०६,४६५, ४६८, ४७१,४७४,३४ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 या गुन्हाचा तपास करत असताना सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचे नेतृत्वाखाली सायबर पोलीसांच्या पथकाने सदर गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषण करून गुन्हयाचे अनुषंगाने ATM मधील CCTV फुटेज ताब्यात घेवून त्याव्दारे आरोपींचा नगर कल्याण रोडने पाठलाग करुन आरोपी  धिरज अनिल मिश्रा , सुरज अनिल मिश्रा (रा नायगाव यांना टोकावडे ता ठाणे) येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३१ बनावट ATM कार्डसह २ लाख ६१ हजार ५०० रुपये हस्तगत करण्यात आले होते.
Related Posts
1 of 1,301
सदर आरोपी यांनी त्यांचा मुख्य साथीदार सुजित राजेंद्र सिंग (रा. वसई जि. पालघर) याचे सांगणेवरून हा गुन्हा केल्याचे सांगीतले तेव्हा पासून सुजित राजेंद्र सिं हा फरार होता दिनांक ११ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आरोपी सुजित राजेंद्र सिंग (मिरारोड वसई) येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने वरील नमुद पथकातील अधिकारी यांनी सदर ठिकाणी जावून सापळा लावून आरोपी यास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव सुजित राजेंद्र सिंग (४४ हल्ली रा. मितालीहाईटसगोल्डन नेस्ट वसई विरार जि.ठाणे मूळ रा. कचवा जि. मिर्झापुर उत्तर प्रदेश )असे सांगीतले.
त्याने सदर गुन्हयाची कबूली देवून त्याचेकडून गुन्हयात वापलेला एक लॅपटॉप ५ मोबाईल हॅण्डसेट, एक कॉम्प्युटर ७ पेनड्राईक ४ ATM कार्ड क्लोन करण्याकरीता लागणारे स्किमर मशिन, एक कलर प्रिंटर, ५४ बनावट ए.टी.एम कार्ड ४६ कोरे बनावट कार्ड ATM कार्ड तयार करण्यासाठी लागणारे, ६ विविध कंपन्याचे सिम कार्ड असा ४७४००/- रू. कि. चा मुददेमाल मिळून आला आहे. सदर आरोपी याचेवर यापूर्वी अहमदबाद, सुरत गुजरात, मुंबई येथे अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी पास गुन्हयात अटक करून मा न्यायालयात हजर केले असता त्यांना मा न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे. पुढील तपास सायबर स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे करीत आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: