देशात ११८ दिवसानंतर सर्वात कमी बाधितांची नोंद, आज इतक्या रुग्णांची नोंद

0

नवी दिल्ली –  देशात सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. देशात तब्बल ११८ दिवसानंतर सर्वात कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात मागच्या चोवीस तासात ३१ हजार ४४३ नव्या बाधितांची नोंद झाली. मागच्या  ११८ दिवसातली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे त्याच बरोबर आता उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या देखली ४ लाख ३१ हजार ३१५ वर पोहोचली आहे. मागच्या १०९ दिवसांतली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

शिवसेनेला धक्का, माजी राज्यमंत्री करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

तर देशात काल दिवसभरात एकूण ४९ हजार ७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ३ कोटी ६३ लाख ७२० वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बर होण्याचा दर आता ९७.२८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

देशात काल दिवसभरात २०२० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंतच्या मृतांची संख्या आता ४ लाख १० हजार ७८४ वर पोहोचली आहे. तर देशाचा मृत्यूदर १.३३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

देशातलं लसीकरण

देशात काल दिवसभरात ४० लाख ६५ हजार ८६२ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी २५ लाख ५८ हजार ८४५ नागरिकांनी पहिला डोस घेतला तर १५ लाख ७ हजार १७ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता ३८ कोटी १४ लाख ६७ हजार ६४६ झाली आहे.

आण्णा हजारेंच्या पत्राने पारनेर तालुका सैनिक बँक चौकशीच्या फेर्‍यात

Related Posts
1 of 1,171
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: