प्रियसीला फोटो पाठवण्यासाठी पट्टा थेट लष्करी हद्दीत त्यानंतर घडले असे….

0 219

अहमदनगर  –  प्रेयसी (Girlfriend) ला लग्नासाठी तयार करण्यासाठी लष्करात नोकरीला असल्याचा बनाव केल्याप्रकरणी लोणी (ता. राहाता) येथील एका युवकाला लष्करी अधिकाऱ्यांनी  पकडून  त्याला भिंगार पोलिसांच्या ताब्यात दिले.  त्याच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.  त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.(The lease to send a photo to girlfriend took place directly within the military border after that ….)

एका खासगी संस्थेमध्ये काम करत असताना लोणीच्या युवकाचे एका मुलीसोबत प्रेम जुळले होते. ‘तुला सरकारी नोकरी लागली तरच मी तुझ्या बरोबर लग्न करेल, नाही तर हे प्रेम प्रकरण इथेच थांबेल’ असे प्रेयसीने त्याला बजावले होते. यासाठी युवकाला भन्नाट कल्पना सुचली. त्याने लष्कराचा गणवेश खरेदी केला. त्या गणवेशातील फोटो प्रेयसीला पाठविला. मात्र, त्यावर समाधानी न होता तिने ‘तू ज्या ठिकाणी लष्करामध्ये नोकरी करतो त्या ठिकाणचे मला फोटो पाठव, असे सुनावले.

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Related Posts
1 of 1,481

रविवारी दुपारच्या सुमाराला युवक गणवेश घालून लष्करी हद्दीमध्ये गेला होता. तेथे फिरत असताना संशय आल्याने लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी  केली. तेव्हा मी एमआयआरसी मध्ये नोकरीस असल्याचे त्याने सांगितले. त्याने दाखविलेले ओळखपत्र बनावट असल्याचे लष्कराच्या लक्षात आहे. तसेच नोकरी तरी मिळवण्यासाठीची काही बनावट कागदपत्रेही तयार केली असल्याचे आढळल्यानंतर थेच लष्करी अधिकाऱ्यांनी त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले. (The lease to send a photo to girlfriend took place directly within the military border after that ….)

पोलीस आयुक्तांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट, वानखेडेंवर दाखल होणार गुन्हा ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: