कोरोनामुळे श्री नागेश्वर मंदीरात दर्शनासाठी गर्दी घटली, मंदीराच्या दारातच प्रतिपिंड

0 10

जामखेड – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्र निमित्ताने जामखेड शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदीर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची तुरळक गर्दी होती तसेच प्रशासनाने मंदीर व्यवस्थापन समितीला मंदीर बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मंदीर प्रशासनाने मंदिर बंद करून दारातच श्री नागेश्वराची पितळी प्रतिपिंड ठेवली होती त्यामुळे भावीक भक्त तेथूनच दर्शन घेत होता.

जामखेड शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदीर व परिसरात दररोज भावीक भक्त येत दर्शनासाठी येत असतात कोरानाचे संकटामुळे ती गर्दी कमी झाली आहे. महाशिवरात्र निमित्ताने दरवर्षी मोठा कार्यक्रम श्री नागेश्वर येथे होत असतो परंतु यावर्षी रंगरंगोटी खेरीज काहीच केले नाही तसेच प्रशासनाने संभाव्य गर्दी टाळण्यासाठी मंदीरच बंद करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते त्यामुळे मंदिर प्रशासनाने मंदीराच्या दारातच पितळी प्रतिपिंड बसवली येणारे भावीक भक्त तेथे बेलपान वाहून दर्शन घेऊन जात असे.

अचानक पणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार ? – सत्यजीत तांबे

Related Posts
1 of 1,292

श्री नागेश्वर मंदीरात दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने तेथे पोलीस व होमगार्डची नियुक्ती केली होती. महिला भक्त येत होत्या परंतु सर्वजण कोरोनाचे नियम पाळले जात होते मंदिर प्रशासनाने येणाऱ्या भक्तांना प्रसाद देऊन गर्दी टाळण्याचे आवाहन करत होता. यामुळे मंदिर परिसरात तुरळक गर्दी होती तसेच अनेक महिला व पुरुष विंचरणा येथे २१ फुट उंच मुर्ती असलेल्या शंकराच्या दर्शनासाठी जात होते.

तर काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन लावावा लागणार – उद्धव ठाकरे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: