The Kashmir Files:चित्रपटावर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले परवानगी .. 

0 248
Rajya Sabha election: Sharad Pawar's first reaction after the result, said Fadnavis ..

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

दिल्ली –  संपूर्ण देशात सध्या चर्चेचा विषय बनलेला चित्रपट म्हणजे द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) होय. या चित्रपटावरून सध्या चांगलंच वाद होत आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष (BJP) राज्यात या चित्रपटाला राज्यात टॅक्स फ्री करण्याची मागणी करत आहे. तर आता दुसरीकडे या चित्रपटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु होण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा आधार घेत भाजप गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत असल्याचा अत्यंत गंभीर आरोप  शरद पवार यांनी केला. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरे सोडावे लागले पण, तिथे मुस्लिमांनाही लक्ष्य बनवले गेले होते.

Related Posts
1 of 2,428

‘काश्मीर फाइल्स’च्या माध्यमातून भाजप धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघडवत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती. देशातील सामाजिक सामंजस्य टिकवण्याचा प्रयत्न न करता हा चित्रपट करमुक्त करून भाजपचे नेते लोकांना तो बघण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, अशी टीका पवार यांनी केली. शरद पवार म्हणाले,मोदी सरकारला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असती तर केंद्राने त्यांचे पुनर्वसन केले असते. पण, हे सरकार मुस्लिमांविरोधात लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करत आहे.

काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांवरील हल्ल्यांमागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जबाबदार होत्या, असे सांगत पवार म्हणाले की, काश्मीर प्रश्नाला सातत्याने पंडित नेहरूंना जबाबदार धरणे योग्य नाही. काश्मिरी पंडित खोऱ्यांतून बाहेर पडले तेव्हा केंद्रात व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. या सरकारला भाजपने पाठिंबा दिला होता. मुफ्ती महम्मद सईद हे केंद्रीय गृहमंत्री होते, जगमोहन राज्यपाल होते. याच जगमोहन यांनी भाजपच्या तिकिटावर दिल्लीत लोकसभेची निवडणूक लढवली होती, असा शाब्दिक प्रहार पवार यांनी केला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: