पोलीस आणि महसूल यांच्या संयुक्त कारवाईने अनेकांची उडाली धांदल

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यात वाढत्या कोरोनाचा ( Corona Virus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्रीगोंदा तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नगरपालिकेचे कर्मचारी यांनी अचानक संयुक्त कारवाई केल्याने अनेकांची धांदल उडालेली चित्र पाहण्यास मिळाले. (The joint action of the police and the revenue rushed many)
जिल्ह्यासह श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नव्याने विविध प्रकारच्या सूचना प्राप्त झाले असून याची अंमलबजावणी करण्यासाठी श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे आणि पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून वीणामास्क फिरणाऱ्या लोकांवर बस स्थानक परिसरात तसेच शनी चौक,रविवार पेठ आदी परिसरात कारवाया करत अनेकांना दंड ठोठावला आहे.
तसेच लसीकरण व त्यांची गरज याची माहिती दिल्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. पोलीस महसूल यांनी संयुक्त कारवाई केल्याने अनेकांची चांगल्या प्रकारे धांदल उडालेली चित्र पाहण्यास मिळाले मात्र अशा अचानक कारवाया करणे गरजेचे असल्याचेही नागरिकांमधून बोलले जात आहेत त्यामुळे नागरिकांमधून मास्क लसीकरण, जागृती बाबत चांगला संदेश गेला असल्याचे शहरातील नागरिकांमधून बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा अचानक कारवाया कायम राहाव्यात अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे. (The joint action of the police and the revenue rushed many)
अबब! शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ , आज इतक्या रुग्णांची नोंद@mrhasanmushrif @InfoAhmednagar @AmcNagar @amhinagarkar #Ahmednagar #corona https://t.co/9BAVh4l5Xn
— DNA (@dnamarathi) January 18, 2022