काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येणार – चंद्रकांत पाटील ,ते दोन नेते कोण?

0 253

नवी मुंबई –   भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज पत्रकार परिषद घेत येत्या दोन दिवसात काँग्रेस(Congress) च्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पाटील यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात ते दोन नेते कोण याची चर्चा जोराने सुरु झाली असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपल्यावर केलेल्या आरोपमागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif)  यांनी केला होता. त्यानंतर लगेचच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्या आरोपांची हवा काढून घेत त्यांनी मुद्द्यावर बोलण्याचं आवाहन केलं. तसेच अनेकांना असं वाटतं की, घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.

पाटील यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार असल्याचं सूचक विधान केलं आहे. पण ते कोण नेते आहेत ते काही त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे अधिकच सस्पेन्स वाढला आहे. ज्या काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत ते राज्यमंत्री आहेत की कॅबिनेट मंत्री? ते आमदार आहेत की नेते आहेत? यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

हे पण पहा –राष्ट्रवादी पुन्हा… नामदेव राऊतांचा भाजपला रामराम…

Related Posts
1 of 1,388

चंद्रकातदादांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी ती नाकारली. त्यानंतरच माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्या, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती. एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात. त्यामुळे त्यांना त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही असंही ते म्हणाले.

हा फार मोठं षडयंत्र , खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील – हसन मुश्रीफ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: