
श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यासह इतर ठिकाणी आपण पाहिले आहे दूध भेसळीचे अड्डे चालवणाऱ्यांविरुद्ध पोलिस अनेकदा अन्नसुरक्षा आणि मानके कायदा (एफएसएस) लावत नाहीत. त्यामुळे भेसळखोर सुटण्याची शक्यता असते.मात्र श्रीगोंदा तालुक्यातील काष्ठी या ठिकाणी झालेल्या कारवाईत मानके कायद्याच्या अंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत त्यामुळे यातील आरोपी सुटण्याची शक्यता फार कमी आहे असे कायदेतज्ञ सांगत आहेत मात्र मागील दोन दिवसापासून कश्याच्यातरी दबावाखाली भेसळीचा तपास मंदावला आहे मात्र याबाबत जनतेमधून विविध शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे
मजुराने कारखाना मालकच्या आईवर चाकूने हल्ला
दूध संघांवर सरकारी अंकुश नाही
सरकारने ठरवून दिलेल्या दुधातील मानकांचे प्रमाण न पाळले जाण्याचे प्रमाण ४६ टक्के असल्याचे ‘शुद्ध दूध, आपला अधिकार’ हे कागदावरच राहिले आहे मानकांचे हे प्रमाण कसोशीने पाळले जाण्यासाठी सरकारी यंत्रणा पुरेशी दक्ष नाही. नामांकित दूध उत्पादकांच्या पिशवीचे सील फाडून पुन्हा जोडलेले अनेक प्रकार पाहण्यास मिळतात तसेच बनावट पिशव्याही आढळल्या. वितरण जाळ्यात गैरप्रकारांना मिळणारा वाव बघता ही यंत्रणा फार विकसित असल्याचे ध्यानात येते. त्यामुळे दूध उत्पादक संघावर सरकारचे नियंत्रण पुरेसे नसल्याचे स्पष्ट आहे.