IPL मध्ये अहमदाबाद आणि लखनऊचा समावेश, जाणून घ्या कोणी लावली बोली

0 301

दुबई-  बीसीसीआय (BCCI) ने आयपीएल (IPL) च्या १५ व्या सत्रासाठी दोन नवीन संघांची सोमवारी घोषणा केली आहे.  २०२२ मध्ये होणाऱ्या या सत्रासाठी अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनौ (Lucknow)  हे दोन संघ सहभागी  होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. संजीव गोयंकाचा आरपीएसजी समूह आणि सीव्हीसी कॅपिटल यांनी अदानी आणि मॅन्चेस्टर युनायटेडची मालक असलेल्या ग्लेझरला बाहेर ढकलत बोली जिंकली, आरपीएसजी समूह लखनौ तर, सीव्हीसी कॅपिटल अहमदाबाद संघांचे मालक बनले आहे. (The inclusion of Ahmedabad and Lucknow in the IPL, find out who made the bid)

दुबईमध्ये टीम बिडिंग प्रक्रियेनंतर या संघांची घोषणा झाली. आरपीएसजी समूहाने ७,०९० कोटींची बोली लावली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली. सीव्हीसी कॅपिटलने ५६०० कोटी रुपयांची बोली लावली. आयपीएल जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे. दोन नवीन संघांच्या समावेशासह बीसीसीआयला एकरकमी मोठी रक्कम मिळणार आहे. पुढील हंगामापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये मेगा लिलाव होणार आहे.

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

हे होते दावेदार

Related Posts
1 of 65

दोन संघ खरेदी करण्यासाठी २२ व्यावसायिक प्रतिष्ठानांनी इच्छा व्यक्त केली होती. या सर्वांनी बोलीची कागदपत्रे खरेदी केली. त्यात अदानी ग्रुप, इंग्लिश फुटबॉल क्लब मॅन्चेस्टर युनायटेडचे मालक ग्लेजर कुटुंबीय, टोरेंट फार्मा, अरबिंदो फार्मा, आरपी-संजीव गोयंका ग्रुप, हिंदुस्तान टाइम्स मीडिया ग्रुप, माजी मंत्री नवीन जिंदल यांच्या मालकीचे जिंदल स्टील, रॉनी स्क्रूवाला आणि तीन खासगी इक्विटी समूहाचा समावेश होता. (The inclusion of Ahmedabad and Lucknow in the IPL, find out who made the bid)

“हे” बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र – जयंत पाटील

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: