72 तोळे सोनं हुंडा घेऊन ही बायकोचा खून करणाऱ्या नवऱ्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

0 496
Criminal gang nabbed for robbing a farm

केरळ –   बायकोच्या पांघरुणात विषारी क्रोबा सोडत पत्नीची हत्या (murdered ) केल्याप्रकरणी केरळमधील एक दोषी पतीविरोधात आखेर न्यायालयाकडून शिक्षा देण्यात आली आहे.  या प्रकरणी न्यायलयाने आरोपी पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पी. सूरज असं आरोपी पतीचा नाव आहे. 2018 मध्ये सूरजचा विवाह उत्तरा नावाच्या तरुणीशी झाला होता. लग्नात त्याला तब्बल 72 तोळे सोनं, एक गाडी आणि पाच लाख रुपये रोख असा हुंडा मिळाला होता. मात्र त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अजून हुंडा हवा होता. त्यासाठी त्यांनी उत्तराचा छळ सुरू केला.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार 2020 मध्ये मे महिन्यात उत्तराला घोणस नावाचा विषारी साप चावला. त्या जीवघेण्या हल्ल्यातून ती बचावली आणि तिच्यावर उपचार सुरू झाले. त्यानंतर 6 मे 2020च्या रात्री उत्तरा गाढ झोपेत असताना सूरजने तिच्या अंगावर नाग सोडला. त्याने नागाला तिला चावण्यासाठी उद्युक्त केलं. दोन वेळा प्रयत्न केल्यानंतर त्याने नागाचे दातही तिच्या अंगात रुतवले. त्यानंतर तो रात्रभर नागाने चावू नये म्हणून जागा राहिला आणि सकाळी नेहमीप्रमाणे उठून नेहमीच्या कामाला लागला. थोड्यावेळाने उत्तरा उठत नसल्याचा बहाणा करून त्याने तिला रुग्णालयात दाखल केलं. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उत्तरा गतप्राण झाली होती.

उत्तराचे वडील राजसेनन यांनी सूरजविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांकडून हे प्रकरण विशेष तपास पथकाच्या स्वाधीन करण्यात आलं. या पथकाने न्यायवैद्यकीय मार्गाने वरकरणी अपघात वाटणाऱ्या खुनाचा पद्धतशीर छडा लावला. त्यांनी प्रथम उत्तराचा न्यायवैद्यकीय अहवाल तपासला. उत्तराच्या अंगावर नागाच्या दाताच्या खुणा या 2.3 ते 2.8 सेमी इतक्या खोल होत्या. सर्वसाधारणतः अपघाताने जेव्हा एखादा नाग डसतो, तेव्हा त्याचे दात मानवी शरीरात 1.7 ते 1.8 इतके खोल रुततात.

शेतीत दुसरा वाटेकरी नको म्हणून भावानेच केला सख्ख्या भावाचा खून

Related Posts
1 of 2,107

या घटनेत नागाच्या डोक्यावर कुणीतरी दाबून मग ते दात रुतवले असावेत अशी खात्री पथकाला झाली. तसंच, उत्तराच्या पोटात झोपेच्या गोळ्यांचे अंश सापडले होते. काही दिवसांपूर्वी तिला चावलेल्या घोणस या विषारी सापाच्या विषाचेही अंश तिच्या अहवालात नमूद होते. शिवाय, जो नाग तिला डसला तो देखील मरण पावला होता आणि मृत्युपूर्वी सात दिवस उपाशी होता. या घटनेचा घटनाक्रम पुन्हा डमी स्वरूपात जेव्हा साकारण्यात आला तेव्हा मिळालेल्या पुराव्यावरून पथकाचा संशय तिच्या पतीवर गेला.

सूरजला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने सत्य उघड केलं. हा नाग त्याने एका गारुड्याकडून आणला होता. त्या गारुड्यानेच त्याला साप हाताळायला शिकवलं होतं. यापूर्वीचा घोणसाचा प्रयोग ही सूरजनेच केला होता. पण, त्या हल्ल्यातून उत्तरा वाचली होती. सूरजला पैशांसाठी दुसरा विवाह करायचा होता. त्यामुळे त्याने उत्तराला मारण्याची योजना बनवली होती.दरम्यान न्यायालयाने अंतिम निकाल जाहीर करताना म्हटले आहे की,’अत्यंत थंड डोक्याने आणि हेतुपुरस्सर ही हत्या केली असून माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे.

हे पण पहा –  जमीर इनामदार यांचे हृदय विकराच्या झटक्याने निधन | देशसेवेत कार्यरत असताना निधन

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: