DNA मराठी

चक्क पतीने घेतला पत्नीच्या हाताला चावा

त्याचा पती किरण याला राग आला व त्याने कोमल यांच्या हाताला चावा घेतला.

0 14

अहमदनगर : पतीसोबत वाद झाल्याने भरोसा सेलमध्ये समुपदेशनासाठी आलेल्या पत्नीशी वाद घालत पतीने चक्क पत्नीच्या हाताला चावा घेतल्याचा प्रकार भरोसा सेलच्या आवारात शुक्रवारी (दि. १२) घडला. याप्रकरणी पतीविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण नामदेव कोठावळे (रा. निमगाव भोगी, ता. शिरुर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत कोमल किरण कोठावळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे दोन महिन्यांपूर्वी पतीसोबत भांडण झाले होते. त्यामुळे सध्या त्या माहेरी रांधेफाटा (ता. पारनेर) येथे राहत आहेत. त्यांनी अहमदनगर येथील भरोसा सेलमध्ये पतिरोधात तक्रार दाखल केली होती.

अनैतिक संबंधातून सख्ख्या मेहुण्याचा तुकडे करुन खून….

Related Posts
1 of 2,494

त्यांना शुक्रवारी बोलविण्यात आले होते. त्यामुळे त्या आईवडिलांसह भरोसा सेलमध्ये आलेल्या होत्या. तेथील काम संपल्यानंतर त्या भरोसा सेलच्या आवारात आल्या. त्यावेळी कोमल यांचे सासरे नामदेव कोठावळे हेही उपस्थित होते. त्यांनी कोमल यांना बोलावले. त्या सासऱ्यांकडे जात असताना पती किरण याने त्यांना शिवीगाळ केली. त्यावर शिवीगाळ करू नको, असे कोमल म्हणाल्या. त्याचा पती किरण याला राग आला व त्याने कोमल यांच्या हाताला चावा घेतला. दरम्यान, कोमल यांचे वडील भांडण मिटविण्यासाठी आले असता त्यांनाही किरण याने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: