माहिती अधिकारात अर्ज करून माहिती मिळत नसल्याने उपोषणास सुरुवात

0

अहमदनगर-  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या  राळेगणसिद्धी गावात  माहिती अधिकार कायदा व माहिती अधिकार अर्जाची पायमल्ली होताना दिसत आहे . अनेक वेळा माहिती अधिकारात अर्ज करून सुनावणी होऊन ही माहिती मिळत नसल्याने आज पासून सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.

सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने तहसिलदारांकडे माहितीच्या अधिकारात अर्जाद्वारे वेगवेगळी माहिती मागविली होती. मात्र  सदर अर्जांची माहिती मुदतीत न मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी अपील दाखल केली होती. अर्जाद्वारे मागणी केलेली माहिती मिळावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे महसूल आयुक्त, मुख्य निवडणूक अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आला होता.   तरीही  देखील मुदतीत माहिती न मिळाल्याने सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे.  समितीचे अध्यक्ष रावसाहेब गाजरे,उपाध्यक्ष रामदास टेकुडे,सचिव बबन नरवडे, विष्णू वाघुले, संजय भोसले,नामदेव वाळुंज,तात्याराम गांगर्डे इत्यादींनी उपोषणास सुरुवात केली आहे

नेमके प्रकरण काय 

उपोषणकर्त्यांनी पारनेरच्या तहसीलदार कडे वेगवेगळया माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागितली होती. मात्र सदर अर्जाची माहिती मुदतीमध्ये देण्यात आली नाही त्यामुळे अपील दाखल करावी लागली. सदर अपिलांच्या सुनावणी वेळी तारीख पुढील देण्यात आली, परंतु त्यावेळी सुध्दा सुनावणी घेण्यात आली नाही व माहिती देखील दिलेली नाही. त्यामुळे उपोषणकर्ते यांनी माहिती आयोग खंडपीठ,नाशिक यांच्याकडे द्वितीय अपिले दाखल केलेली आहेत. सदरची अपिले प्रलंबित आहेत.

“या” दिवशी लागणार बारावीचा निकाल? , जाणून घ्या संपूर्ण माहिती

Related Posts
1 of 1,153

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीच्या खर्चाच्या ऑडिटची मागणी केली होती. सदर मागणीची पडताळणी केली असता, मुख्य निवडणूक अधिकारी यांनी नगरच्या जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दि.२५ फेब्रुवारी २०२१ रोजी पत्राद्वारे कळविले होते, परंतु सदर पत्राचा कोणत्याही प्रकारचा विचार केलेला नाही. त्यामुळे उपोषणकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबन केलेला आहे.

जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी या गावातून माहिती अधिकार अर्जाचा उगम झाला परंतु त्याच जिल्ह्यातील व त्याच तालुक्यातील अधिकारी माहिती अधिकार कायदा व माहिती अधिकार अर्जाची पायमल्ली करीत आहेत याला कोठेतरी आळा बसेल अशी व्यवस्था राज्य सरकारने करावी अशी मागणी सावकारग्रस्त शेतकरी समितीतर्फे मागणी आहे.

महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात – देवेंद्र फडणवीस

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: