
मुंबई – मागच्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात कडक उन्हाचा तडाखा कायम आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. राज्यातील विदर्भात कमाल तापमानाचा पारा 44 अंशाच्या आसपास आहे.
यामुळे भारतीय हवामान विभागाने या ठिकाणी 8 आणि 9 मे रोजी तुरळक भागामध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. आगामी 3 ते 4 दिवसांच्या कालावधीत तापमानाचा पारा काही प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
देशातील बहुतांश भागात सध्या पावसाळी (Rain) स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा विचार करता विदर्भातील नागरीकांना उन्हाची झळ सोसावी लागत आहे. एप्रिल महिन्यात विदर्भामध्ये 45 ते 46 अंशांच्या पुढे तापमानाची नोंद झाली होती. तसेच, मराठवाडा (Marathwada) आणि उत्तर महाराष्ट्रातही (North Maharashtra) 44 ते 45 अंशांपुढे तापमान गेले होते.
दरम्यान, आता उत्तरेकडील बहुतांश ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच तापमानात देखील वाढ सुरू आहे. मागील 4 ते 5 दिवसांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील तापमानात किंचित घट झाली आहे. दरम्यान अजुन काही ठिकाणी तापमान देशात उच्चांकी ठरत आहे. असं हवामान खात्याकडून (IMD) सांगण्यात येत आहे. उत्तर-पश्चिम भारतातील (Northwest India) तापमान सध्या कमी झाले असले, तरी त्यात 2 ते 3 अंशांनी वाढ होणार आहे. विदर्भातही 2 दिवसांत तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्याता आहे